शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

देवाला हजर राहण्याची नोटीस मग गावकरी चक्क शिवलिंग घेऊन पोहोचले कोर्टात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 22:27 IST

छत्तीसगडच्या एका न्यायालयात शुक्रवार चक्क देवानं हजेरी लावली. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे. छत्तीसगडमधील रायगडच्या महसूल अधिकाऱ्यांच्या कृपेनं हा पराक्रम घडला आहे.

छत्तीसगडच्या एका न्यायालयात शुक्रवार चक्क देवानं हजेरी लावली. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे. छत्तीसगडमधील रायगडच्या महसूल अधिकाऱ्यांच्या कृपेनं हा पराक्रम घडला आहे. महसूल अधिकाऱ्यांनी चक्क भगवान शंकराला आरोपी बनवून कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. इतकंच नव्हे, तर न्यायालयात हजर न झाल्यास १० हजार रुपये दंड ठोठावणार असल्याचं नोटीसमध्ये नमूद केलं होतं. आता देव तर स्वतः येऊ शकत नाही, अशा स्थितीत त्यांच्या भक्तांनी म्हणजेच स्थानिक लोक चक्क मंदिरातील शिवलिंग घेऊन कोर्टात पोहोचले, मात्र कोर्टातही देवाला दिलासा मिळाला नाही, कारण कोर्टानं त्यांना पुढील तारीख दिली आहे. सदर प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 

त्याचं झाल असं की रायगडमधील अवैध धंदे आणि बांधकामांबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याच प्रकरणात रायगड तहसील न्यायालयानं २३ ते २४ फेब्रुवारी आणि २ मार्च रोजी सीमांकन पथक स्थापन करून कौहाकुंडा गावात चौकशी केली. त्यात अनेकांनी अवैधरित्या जमिनीवर ताबा मिळवल्याचं लक्षात आलं. यानंतर न्यायालयानं १० जणांना नोटीस बजावली होती. ठरलेल्या तारखेला कोर्टात हजर झाला नाहीत, तर प्रत्येकी १० हजार रुपयांचं दंड भरावा लागेल असंही त्यात नमूद करण्यात आलं होतं. त्याचबरोबर संबंधित परिसरात कोणत्याही प्रकारच्या बांधकामावरही बंदी घालण्यात आली होती.

कोर्टानं चक्क शंकराच्या मंदिरासह १० जणांना बजावली होती नोटीसयाप्रकरणी शुक्रवारी सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती. ज्या १० जणांना न्यायालयानं नोटीस बजावली आहे, त्यात कोहकुंडा येथील प्रभाग २५ मध्ये बांधलेल्या शिवमंदिराचाही समावेश आहे. एकाही पुजाऱ्याचं नाव नसल्यामुळे थेट शिवमंदिरालाच नोटीस बजावण्यात आली होती. नोटीसमध्ये आरोपी हजर न झाल्यास १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचं नमूद करण्यात आलं होतं. अशा स्थितीत स्थानिक लोकांनी मंदिरातील शिवलिंग काढून ते एका ट्रॉलीवर ठेवलं आणि कोर्ट गाठलं.

कोर्टात पोहोचल्यावर मिळाली 'तारीख पे तारीख'शिवलिंग घेऊन लोक कोर्टात पोहोचले, मात्र पीठासीन अधिकारी इतर अधिकारी महसूल कामात व्यग्र असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी १३ एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली. दुसरीकडे, तहसीलदार गगन शर्मा यांना नोटिशीची माहिती नसल्याचं म्हटलं आहे. नायब तहसीलदारांनी ही नोटीस बजावली आहे. त्यात काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त केल्या जातील. जनसुनावणीमुळे न्यायालयाची तारीख वाढवण्यात आली आहे, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया