शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 12:47 IST

भागलपूर जिल्ह्यात बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे.

ठळक मुद्देभागलपूर जिल्ह्यात बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे. आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

भागलपूर - बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. बिहारमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भागलपूर जिल्ह्यात बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील भागलपूरमध्ये एका 22 वर्षीय बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आरोपीने पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे. आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

भागलपूल जिल्ह्यातील शिवनारायणपूर पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली. बुधवारी (5 जून) नवटोलिया गावात 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आरोपीने केलेल्या गुन्ह्याचा पुरावा मागे राहू नये यासाठी पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे संबंधित तरुणीच्या भाऊजीनेच हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये तरुणी 65 टक्के भाजली आहे. तरुणीला तातडीने उपचारासाठी जेएलएनएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका तरुणाला जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला होता. विवाहीत महिलेशी लग्न केलं म्हणून एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. ओरलहिया गावात ही घटना घडली. श्रवण महतो असे मृत तरुणाचे नाव असून तो ओरलहिया गावाचा रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, श्रवणचे एका महिलेशी लग्न झाले होते. मात्र गावातील दुसऱ्या एका विवाहीत महिलेशी त्याचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे श्रवणने आपल्या पहिल्या पत्नीला सोडून विवाहीत महिलेशी पळून जावून लग्न केलं होतं. काही दिवस ते दोघेही फरार होते. मात्र काही दिवसांनी ते पुन्हा गावात परतले आणि पंचायतीकडे त्यांना गावात परत घेण्याची विनंती केली होती. श्रवणने पळून जाऊन लग्न केल्यामुळे तिच्या पहिल्या पत्नीचे नातेवाईक नाराज झाले होते. संतापाच्या भरात त्यांनी श्रवणला बेदम मारहाण करत पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 70 टक्क्यांहून अधिक भाजल्याने श्रवणचा मृत्यू झाला होता. 

 

टॅग्स :Biharबिहारfireआग