कोची : केवळ १६ वर्षांच्या मुलाला ऑनलाइन डेटिंग ॲपच्या माध्यमातून जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार करणाऱ्या १४ जणांविरोधात केरळ पोलिसांनी कारवाई केली आहे. या आरोपींमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश असून, या घटनेने मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेबाबतचे गंभीर प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित केले आहेत.
मुलांचे वेगवेगळे आकर्षणएर्नाकुलम जिल्ह्यातील डी-डीएडी केंद्राचे समन्वयक म्हणाले, “मुलगे प्रामुख्याने ऑनलाइन गेम्सच्या आहारी जातात, तर मुली सोशल मीडियाकडे आकर्षित होतात.” मार्च २०२३ ते जुलै २०२५ या काळात या केंद्रांमध्ये १,९९२ प्रकरणे नोंदली गेली. त्यापैकी ५७१ ऑनलाइन गेमच्या व्यसनाशी संबंधित होती.
४१ मुलांची आत्महत्यामुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी विधानसभेत माहिती दिली की, जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२५ दरम्यान मोबाइल व इंटरनेटच्या गैरवापरामुळे तब्बल ४१ मुलांनी आत्महत्या केली.अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू चिल्ड्रन या मोहिमेत राज्यातील १,२२७ शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहेत. तसेच १,०१२ शाळांमध्ये मानसशास्त्रीय समुपदेशक नेमण्यात आले आहेत.
Web Summary : Kerala police arrested 14 for sexually abusing a minor met on a dating app. Online games and social media attract children, leading to addiction. Sadly, 41 children committed suicide due to mobile/internet misuse. Awareness programs are underway in schools.
Web Summary : केरल पुलिस ने डेटिंग ऐप पर मिले नाबालिग से यौन शोषण के आरोप में 14 लोगों को गिरफ्तार किया। ऑनलाइन गेम और सोशल मीडिया बच्चों को आकर्षित करते हैं, जिससे लत लगती है। दुख की बात है, मोबाइल/इंटरनेट के दुरुपयोग के कारण 41 बच्चों ने आत्महत्या कर ली। स्कूलों में जागरूकता कार्यक्रम चल रहे हैं।