शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Old Is Gold: खबरदार, जुने सोने विकायला जाल तर! जीएसटी भरावा लागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 11:10 IST

सोने आणि बहुमुल्य रत्नांच्या वाहतुकीसाठी ई-वे बिल सुविधा सुरु करण्यासाठी या मंत्रीगटाची स्थापना करण्यात आली होती. कोरोना काळामुळे या मंत्र्यांची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. 

आता जुन्या सोन्यावर किंवा दागिन्यांवरही जीएसटी लावण्यात येणार आहे. जुने सोने विकायला गेल्यास त्यावर तीन टक्के वस्तू आणि सेवा कर (GST) भरावा लागण्याची शक्यता आहे. जीएसटी समितीच्या पुढील बैठकीत यावर निर्णय होणार आहे. केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी ही माहिती दिली आहे. याचाच अर्थ जुने सोने विकाय़ला गेल्या त्यावर मिळणारा फायदा कमी होणार आहे. 

थॉमस इसाक यांनी सांगितले की, नुकत्याच काही  राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत जुने सोने आणि दागिन्यांच्या विक्रीवर तीन टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लावण्याच्या प्रस्तावावर सहमती मिळाली आहे. या बैठकीत जुन्या सोन्यावर तीन टक्के जीएसटी आरसीएम (रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम) द्वारे आकारण्यात येण्याबाबत ठरले आहे. यावर आता समितीचे अधिकारी नियमावलींचा विचार करणार आहेत. 

वृत्तसंस्था पीटीआयनुसार या मंत्री गटामध्य़े केरळ, बिहार, गुजरात, पंजाब, कर्नाटक आणि पश्चिम बंगालचे अर्थमंत्री सहभागी आहेत. सोने आणि बहुमुल्य रत्नांच्या वाहतुकीसाठी ई-वे बिल सुविधा सुरु करण्यासाठी या मंत्रीगटाची स्थापना करण्यात आली होती. कोरोना काळामुळे या मंत्र्यांची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. 

नवीन यंत्रणा लागू झाल्यानंतर एखादा ज्वेलर ग्राहकाकडून जुने दागिने खरेदी करत असेल तर रिव्हर्स शुल्काच्या रुपात तो ग्राहकाकडून 3 टक्के जीएसटी वसूल करणार आहे. जर तुम्ही 1 लाख रुपयांचे दागिने विकत असाल तर तुमच्याकडून तीन हजार रुपये कापून घेतले जाणार आहेत. 

दुकानदारांसाठी ई-वे बिल सक्तीचेमंत्र्यांच्या या जीओएमने सोन्याचे दागिने किंवा सोने खरेदी विक्रीसाठी प्रत्येक दुकानदाराला लिए ई-इनव्हॉईस (ई-बिल) काढावे लागणार आहे. करचोरी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे. आताही अनेक शहरांत ज्वेलर्स सोने खरेदी विक्रीचे कच्चे बिल देतात. काळ्या पैशांवर वचक ठेवण्यासाठी नवीन प्रणाली आणण्यात येणार आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

मुकेश अंबानी चार छोट्या कंपन्या खरेदी करणार; रिलायन्सकडून जोरदार प्रयत्न

BSNL चा जबरदस्त प्लॅन; केवळ 78 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉलिंग

बघतोच अमेरिका F-16V कसे उडवितो! चीन खवळला; तैवानची एयरफील्डच उद्ध्वस्त करण्याची धमकी

सावधान! Work From Home चा मोठा फटका बसणार; Income Tax भरताना नाकीनऊ येणार

हवामान बदल धोक्याचा; 'देवीसारखे जुने व्हायरस आयुष्यात परतणार', संशोधकांचा इशारा

शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये मिळाले नाहीत? अशी करा तक्रार

TATA कंपनीला ब्रिटिशांचा 'टाटा'; मिळणार नाही बेलआऊट पॅकेज

मैदान सोडलय, क्रिकेट नाही! धोनीच्या नव्या कंपनीचे मुंबईत ऑफिस; कानोकान खबर नाही

चीनला दणका! अमेरिका तैवानला देणार लढाऊ विमानांची फौज

व्होडाफोन, एअरटेल ग्राहकांना झटका देणार; सप्टेंबरपासून रिचार्ज महाग होण्याची शक्यता 

टॅग्स :GoldसोनंGSTजीएसटी