शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff; लेहसोबत आता समुद्रात भारताने दाखवली ताकद; चीनला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 10:06 IST

अंदमान आणि निकोबार बेटांवर भारताचा युद्ध सराव करण्याला विशेष महत्त्व आहे. कारण याठिकाणाहून चिनी समुद्री मार्गाने जात असतात.

ठळक मुद्देलडाखमध्ये चर्चेनंतरही चिनी कुरापती सुरुच असल्याने भारत सतर्क समुद्रात भारतीय नौदलाने युद्धसराव करुन चीनला दिला इशारा चिनी व्यापारी हालचाली असणाऱ्या अंदमान व निकोबार बेटांजवळ नौदलाचा युद्धसराव

नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यातील तणाव अद्यापही पूर्णपणे संपुष्टात आला नाही. चिनी कुरापतींना उत्तर देण्यासाठी भारतीय जवान सज्ज आहेत. दुसरीकडे अरबी समुद्रात ड्रीलच्या माध्यमातून चीनला योग्य संदेश देण्याचं काम भारताने केले आहे. भारतीय नौदलाने अंदमान आणि निकोबार बेटांवर कवायती करुन भारत दडपशाहीला बळी पडणार नाही असा इशाराच चीनला दिला आहे.

अंदमान आणि निकोबार बेटांवर भारताचा युद्ध सराव करण्याला विशेष महत्त्व आहे. कारण याठिकाणाहून चिनी समुद्री मार्गाने जात असतात. अनेक व्यापारी कार्यवाही येथे केली जाते. चीनसाठी हा सराव दुहेरी हल्ल्यासारखा असू शकतो. कारण यापूर्वी अमेरिकेने दक्षिण चिनी समुद्रात दोन एअरक्राफ्ट लढाऊ विमानांसह सराव करत आहेत. चीनला त्यांना धमकी देण्याशिवाय काहीच करता येत नाही.

या बेटांवर भारतीय नौदल युद्धसराव करत आहे. यात विनाशक, पेट्रोल विमान आणि पाणबुड्यांचा समावेश आहे. या सरावाचं नेतृत्व करणारे पूर्वेकडील नौदल कमांडचे प्रमुख रियर एडमिरल संजय वत्सयन म्हणाले की, मल्लकाजवळ असणारी काही युद्धनौकाही यात सामील झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सबमरीन शोधणाऱ्या एअरक्राफ्ट Poseidon 81,ज्यात घातक ब्लॉक मिसाइल लावण्यात आलं आहे. MK 54 लाइटवेज टोरपीडोज यांचाही युद्धसरावत समावेश आहे. यापूर्वी मल्लकामध्ये भारत आणि जपानने मागील महिन्यात सराव केला होता.

गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमधील तणावपूर्ण परिस्थितीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी लेह येथे पोहोचले. त्यांच्यासमवेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे होते. पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर संरक्षणमंत्र्यांचा लेह दौरा आता खूप महत्वाचा मानला जात आहे.  पूर्व लडाखमध्ये ५ मेपासून भारतीय आणि चिनी सैन्याच्या दरम्यान संघर्ष सुरू आहे. गलवान खोऱ्यात दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले त्यानंतर हा तणाव वाढला. दरम्यान, कित्येक बैठकानंतर मुत्सद्दी व सैनिकी चर्चेनंतर दोन्ही बाजूंच्या सैन्य ६ जुलैपासून तणावग्रस्त परिसरातून मागे हटण्यास सुरुवात झाली आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावAmericaअमेरिकाIndiaभारतchinaचीन