शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Bengaluru Stampede: "मुलाच्या मृतदेहाचे तुकडे करू नका..."; चेंगराचेंगरीत गमावला एकुलता एक मुलगा, वडिलांचा टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 10:36 IST

Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीत एका व्यक्तीने आपला एकुलता एक मुलगा गमावला. लेकाच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांनी टाहो फोडला.

बंगळुरूच्या संघाची विजयी मिरवणूक बुधवारी काढण्यात आली. यानंतर बंगळुरू संघातील क्रिकेटपटूंचा सत्कार सोहळा  चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होता. यासाठी स्टेडियमबाहेर लाखो चाहत्यांची गर्दी उसळली होती. परंतु ही गर्दी पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने तिथे चेंगराचेंगरी झाली. त्यात ११ जणांचा मृत्यू झाला, तर ४७ जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

चेंगराचेंगरीत एका व्यक्तीने आपला एकुलता एक मुलगा गमावला. लेकाच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांनी टाहो फोडला. पोस्टमॉर्टम न करता मुलाचा मृतदेह द्या अशी कळकळीची विनंती ते आता करत आहेत. मी मुलगा गमावला आहे. आता त्याच्या मृतदेहाचे तुकडे करू नका असं ते सतत म्हणत आहेत. त्यांचं हे दु:ख पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. 

"माझा एकुलता एक मुलगा होता"

"मुलाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करू नका, त्याचा मृतदेह मला द्या, त्याच्या मृतदेहाचे तुकडे करू नका. तो माझा एकुलता एक मुलगा होता आणि आज मी त्याला गमावलं. तो मला न सांगता येथे आला होता. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येथे येतील, भेट देतील पण माझ्या मुलाचा जीव कोणीही परत आणू शकत नाही" असं वडिलांनी म्हटलं आहे.  

 "काहींना पास मिळाला, गेट उघडताच..."; चेंगराचेंगरीचं कारण समोर, लोकांनी सांगितलं काय घडलं?

पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी हजारो लोक स्टेडियमच्या आत जमले होते. सुरुवातीला या कार्यक्रमासाठी पास देण्यात आले होते. परंतु काही लोकांनाच पास मिळाला आणि जेव्हा सर्वांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली तेव्हा गेट उघडताच मोठी गर्दी झाली. हजारो लोकांनी जबरदस्तीने आत जाण्याचा प्रयत्न केला आणि सर्व दिशांनी लोक आत येऊ लागले. प्रवेशद्वाराचा रस्ता छोटा होता. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि बॅरिकेड खाली पडले. काही वेळातच लोक त्याखाली दबले गेले आणि गर्दीने त्यांना चिरडलं. पोलिसांनी जखमी आणि बेशुद्ध लोकांना उपचारासाठी ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेलं.  

टॅग्स :Bengaluru Stampedeबंगळुरुमध्ये चेंगराचेंगरीRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरPoliceपोलिसBengaluruबेंगळूरStampedeचेंगराचेंगरी