शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

Bengaluru Stampede : "दिव्यांशीला विराट कोहलीला पाहायचं होतं..."; आईने सांगितलं चेंगराचेंगरीच्या वेळी काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:14 IST

Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ४७ जण जखमी झाले. या चेंगराचेंगरीत दिव्यांशीचाही मृत्यू झाला आहे. तिच्या आईने स्टेडियमबाहेर नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. 

बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) च्या आयपीएल विजयाच्या जल्लोषादरम्यान स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ४७ जण जखमी झाले. या चेंगराचेंगरीत दिव्यांशीचाही मृत्यू झाला आहे. तिच्या आईने स्टेडियमबाहेर नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. 

"पायलट किंवा डॉक्टर व्हायचं दिव्यांशीच स्वप्न होतं. ती खूप चांगली होती. मी कोणालाही दोष देऊ शकत नाही. स्टेडियमच्या आत जाण्याचा आमचा कोणताही प्लॅन नव्हता. आम्ही आरामात फूटपाथवर बसून पाहत होतो. दिव्यांशीला क्रिकेटची खूप आवड होती. ती क्रिकेट खेळाडूंबद्दल सर्व काही सांगायची. तिला विराट कोहलीला पाहायचं होतं" अशी माहिती दिव्यांशीच्या आईने दिली.

"मुलाच्या मृतदेहाचे तुकडे करू नका..."; चेंगराचेंगरीत गमावला एकुलता एक मुलगा, वडिलांचा टाहो

"मला तिचा अभिमान"

"मला श्वास द्यायला त्रास होत होता. मी एका व्यक्तीला वाचवलं. फक्त ५ मिनिटं त्यामध्ये गेली. तेव्हा ती तिथे नव्हती. मला वाटलं की, ती आतमध्ये गेली आहे. शिक्षकांना तिचा खूप अभिमान वाटत होता. फक्त २ वर्षे झाली होती तिला नवीन शाळेत जाऊन, मला तिचा अभिमान आहे, ती माझ्यासाठी एक आदर्श होती, माझ्यासाठी एक देवदूत होती."

“मी त्याला खूप प्रेमाने वाढवलं, आता तो सोडून गेला”; पाणीपुरीवाल्याच्या लेकाचा चेंगराचेंगरीत मृत्यू

"जास्त पोलीस तैनात करण्यात आले नव्हते"

"माझं अनमोल रत्न होती, परी होती. मी वाहतूक पोलिसांना दोष देईन कारण ही परिस्थिती कशी हाताळायची हे त्यांना माहित नव्हतं का? जास्त पोलीस तैनात करण्यात आले नव्हते. गर्दी हाताळण्याचा प्रयत्न कोणीही करत नव्हतं. हे सर्व घडत असताना सरकार आत आनंद साजरा करणं हे वेडेपणा होतं. मानवता आतमध्ये असली पाहिजे, आपण ती निर्माण करू शकत नाही" असं देखील दिव्यांशीच्या आईने म्हटलं आहे. 

 "काहींना पास मिळाला, गेट उघडताच..."; चेंगराचेंगरीचं कारण समोर, लोकांनी सांगितलं काय घडलं?

शिवलिंग स्वामीचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे. तो मूळचा यादगीर जिल्ह्यातील होता आणि सध्या ते बंगळुरूच्या येलहंका येथे त्यांच्या कुटुंबासह राहत होता. त्याने यावर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि पीयूसीमध्ये प्रवेश घेण्यासाठी शाळेतून त्यांचे ट्रान्सफर सर्टिफिकेट (टीसी) आणणार असल्याचे सांगून घरातून गेला होता. पण त्यानंतर तो चिन्नास्वामी स्टेडियममध्ये गेला आणि चेंगराचेंगरीत त्याचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Bengaluru Stampedeबंगळुरुमध्ये चेंगराचेंगरीStampedeचेंगराचेंगरीPoliceपोलिसRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर