बंगळुरु एर्नाकुलम एक्सप्रेसला अपघात, १० ठार
By Admin | Updated: February 13, 2015 12:07 IST2015-02-13T09:56:39+5:302015-02-13T12:07:21+5:30
बंगळुरु एर्नाकुलम इंटरसिटी एक्सप्रेसचे नऊ डबे रुळावरुन घसरल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

बंगळुरु एर्नाकुलम एक्सप्रेसला अपघात, १० ठार
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. १३ - बंगळुरु एर्नाकुलम इंटरसिटी एक्सप्रेसचे नऊ डबे रुळावरुन घसरल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून ७० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
शुक्रवारी सकाळी बंगळुरु एर्नाकुलम इंटरसिटी एक्सप्रेस साडे सहाच्या सुमारास बंगळुरुहून एर्नाकुलमच्या दिशेने निघाली होती. सकाळी साडे सातच्या सुमारास कर्नाटक - तामिळनाडू सीमेवरील एनकेल येथे एक्सप्रेसचे इंजिनसह नऊ डबे रेल्वे रुळावरुन घसरले. अपघातात काही डबे एकमेकांवर चढल्याने प्रवाशांना बाहेर पडणेही अशक्य झाले होते. या अपघातात आत्तापर्यंत ३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मदतकार्याला सुरुवात झाली असून १८ रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाला आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
'सकाळी गाडीत बसल्यावर अनेक जण झोपी गेले होते. मात्र तासाभरानंतर आम्हाला जोरदार आवाज आला. आम्ही कसेबसे ट्रेनच्या बाहेर पडलो आणि नेमके काय झाले ते बघितले. डी ८ आणि डी ९ हे डबे एकमेकांवर चढले होते. या दोन डब्यांमध्येच जास्त प्रवासी अडकले असून सर्वाधिक नुकसान या दोन डब्यांचेच झाले आहे अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली.