शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीकडून उकळले अडीच कोटी रुपये! व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले; दागिने आणि आलिशान कारही घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 18:56 IST

कर्नाटकच्या बंगळुरुत एका महिलेला तिच्या प्रियकरावर विश्वास ठेवणे महागात पडलं आहे.

Karnataka Crime :कर्नाटकच्या बंगळुरुत एका महिलेला तिच्या प्रियकरावर विश्वास ठेवणे महागात पडलं आहे. बंगळुरूमध्ये एका व्यक्तीने आपल्या प्रियसीला ब्लॅकमेल करून तिच्याकडून अडीच कोटी रुपये उकळले आहेत. प्रियकराने मुलीसोबत इंटिमेट व्हिडिओ बनवले आणि त्यानंतर तिला ब्लॅकमेल केले. अनेक महिने हे ब्लॅकमेलिंग सुरूच होते. या दरम्यान त्याने तरुणीचे दागिने, महागडी घड्याळे आणि महागडी कार हिसकावून घेतली. भीतीपोटी मुलीने अडीच कोटी रुपये आणि दागिने, महागडी घड्याळे आणि एक महागडी कारही प्रियकराला दिली आहे. मुलीच्या तक्रारीनंतर आता पोलिसांकडून खंडणीच्या आरोपाखाली आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन कुमार असे आरोपीचे नाव आहे. पीडितेला ब्लॅकमेल करण्यापूर्वी तो तिच्याशी संबंधात होता. दोघांनी एकत्र बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले, परंतु पदवीनंतर त्यांचा संपर्क तुटला. काही वर्षांनी ते एकमेकांशी पुन्हा एकत्र आले आणि डेटिंग करू लागले. कुमारने शेवटी त्या तरुणीला लग्न करण्याचे वचन दिले आणि तिला आपल्यासोबत बाहेर नेले. यानंतर त्याने तरुणीचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ काढले. आपण हे सर्व केवळ स्वत:साठी करत असल्याची ग्वाहीही त्याने तरुणीला दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक व्हिडिओंमध्ये मोहनचा चेहरा दिसणार नसल्याची काळजी घेण्यात आली होती.

त्यानंतर कुमारने तरुणीला ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केली. आपले खासगी फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक होतील या भीतीने तरुणीने मोहन कुमारला काही महिन्यांत २.५७ कोटी रुपये दिले. मोठी रक्कम न दिल्यास व्हिडिओ अपलोड करू, अशी धमकीही त्याने दिली. यामुळे घाबरलेल्या मुलीने आजीच्या बँक खात्यातून १.२५ कोटी रुपये काढले. नंतर हे पैसे मोहनने दिलेल्या काही खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले.

त्यानंतर तरुणीने मोहनला सुमारे १.३२ कोटी रुपये रोख दिले. मात्र, मोहनच्या मागण्या इथेच संपल्या नाहीत. त्याने तरुणीकडून महागडी घड्याळे, दागिने आणि आलिशान कार घेतली. अनेकवेळा त्याने त्याच्या वडिलांच्या खात्यात पैसेही ट्रान्सफर करुन घेतले. मोहन कुमार सातत्याने पैशांची मागणी करत असताना पीडित मुलीने हिंमत दाखवत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर मोहनला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, आरोपींनी अंदाजे २.५७ कोटी रुपये उकळले असून त्यापैकी ८० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकBengaluruबेंगळूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस