दंत चिकि त्सा कें द्राचा गरजूंनी लाभ घ्यावा
By Admin | Updated: February 13, 2015 23:10 IST2015-02-13T23:10:53+5:302015-02-13T23:10:53+5:30

दंत चिकि त्सा कें द्राचा गरजूंनी लाभ घ्यावा
> प्रवीण दटके : दंतचिकि त्सा केंद्राचे लोकार्पणनागपूर : दंतचिकि त्सा महाग झाली आहे. सर्वसामान्यांना ती परवडणारी नसल्याने महापालिके ने कर्तव्य भावनेतून शहरातील नागरिकांना ही सेवा अल्पदरात उपलब्ध केली आहे. सोबतच अन्य सुविधा देण्यात येतील. याचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर प्रवीण दटके यांनी शुक्रवारी मनपाच्या सदर रोगनिदान केंद्रातील दंत चिकि त्सा केंद्राचे लोकार्पण प्रसंगी केला.मनपाचा आरोग्य विभाग व नबिदाद स्मृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खासगी सहभागातून अत्यल्प शुल्कात ही सेवा दिली जाणार आहे. गरजूंना याचा लाभ होईल. सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान ही सेवा दिली जाणार आहे. यावेळी उपमहापौर मुन्ना पोकुलवार, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य समितीचे सभापती रमेश सिंगारे, झोन सभापती सरस्वती सलामे, सुमित्रा जाधव, सारिका नांदूरकर, नगरसेवक सुनील अग्रवाल, लता यादव, मीना तिडके, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, आरोग्य अधिकारी डॉ. सविता मेश्राम, डॉ. आर.एम. बल्लाळ, नबिदाद स्मृती संस्थेचे डॉ. एस.बी. पटेल, दंतचिकि त्सक डॉ. समीना पटेल, केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार आदी उपस्थित होते.प्रस्ताविक व संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी तर आभार डॉ. साकीब पटेल यांनी मानले. रोगनिदान केंद्रातील डॉक्टर विवेक जोशी, अतिक खान, मोईन खाजा, तणवीर मिर्जा, महेश जिंगरवार, भूमिका पीटर, काल्पक पीटर, सतीश बंग, अनुप चांडक, समरीन सय्यद व सोनाली भैसारे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)