शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पीएम किसान योजनेचे महाराष्ट्रातील लाभार्थी घटले; निकषात नाहीत, २२.४० लाख शेतकरी वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 06:31 IST

पीएम किसानअंतर्गत महाराष्ट्रात १.०८ कोटीपेक्षा जास्त लाभार्थी होते. ज्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून ६००० रुपये प्रति वर्ष मिळत होते.

- हरीश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पीएम किसान योजनेंतर्गत लाभार्थींची सर्वाधिक घट महाराष्ट्रात झाली आहे. राज्यात चार वर्षांच्या कालावधीत २२.४० लाख शेतकरी या योजनेच्या यादीतून वगळण्यात आले आहेत. 

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसानअंतर्गत महाराष्ट्रात १.०८ कोटीपेक्षा जास्त लाभार्थी होते. ज्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून ६००० रुपये प्रति वर्ष मिळत होते. तथापि, लाभार्थ्यांची संख्या वेगाने घसरू लागली आणि ८५.६० लाखांवर आली. २०२३-२४ मध्ये जुलै २०२३ पर्यंत ही घसरण वाढत गेली. लाभार्थ्यांची संख्या २२.४० लाखांनी कमी झाली आहे. 

या योजनेअंतर्गत ६००० रुपये २००० च्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले जातात. जमीन, बँक खात्यांशी आधार लिंक असणे आणि इतर निकष तपासल्यानंतर ही संख्या खाली आली आहे. महाराष्ट्रात ही संख्या २०२०-२१ मध्ये १.०८ कोटींवरून २०२२-२३ मध्ये १.०४ कोटी आणि जुलै २०२३ पर्यंत ८५.४० लाखांवर आली आहे. 

सर्वाधिक लाभार्थी अहमदनगरमध्ये आकडेवारीनुसार पीएम किसान योजनेअंतर्गत सर्वांत जास्त लाभार्थी अहमदनगरमध्ये ५.१७ लाख आहेत. त्यानंतर सोलापूरमध्ये ४.५४ लाख, कोल्हापूर ४.०६ लाख, बीड व पुण्यात ३.८९ लाख, नागपूर १.५० लाख, नाशिक ३.८५ लाख, छत्रपती संभाजीनगर ३.२६ लाख आणि यवतमाळमध्ये २.७७ लाख लाभार्थी आहेत. या योजनेचे ३४ जिल्ह्यांत लाभार्थी आहेत.  

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना