बेलवंडी-शिर्डी दिंडी

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:59+5:302015-02-15T22:36:59+5:30

श्रीगोंदा : बेलवंडी येथील साईभक्तांची दिंडी रविवारी शिर्डीकडे मार्गस्थ झाली. दिंडीत सुमारे शंभर साईभक्त सहभागी झाले असून दिंडीचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. जि.प. उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, नामदेव हिरडे, सरपंच सरस्वती डाके, दिलीप रासकर यांनी दिंडीला निरोप दिला.

Belvandi-Shirdi Dindi | बेलवंडी-शिर्डी दिंडी

बेलवंडी-शिर्डी दिंडी

रीगोंदा : बेलवंडी येथील साईभक्तांची दिंडी रविवारी शिर्डीकडे मार्गस्थ झाली. दिंडीत सुमारे शंभर साईभक्त सहभागी झाले असून दिंडीचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. जि.प. उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, नामदेव हिरडे, सरपंच सरस्वती डाके, दिलीप रासकर यांनी दिंडीला निरोप दिला.
लोकन्यायालयात
३६ प्रकरणे निकाली
नेवासा : येथे शनिवारी आयोजित लोकन्यायालयात ३६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये बँकांची सतरा व अठरा दिवाणी दावे निकाली निघाली. धनादेश बाबतची फौजदारी केस तडजोडीने मिटली.
जिल्हा सत्र न्यायाधीश शरद कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने लोकन्यायालयाचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर न्यायाधीश नितीन पाटील, न्यायाधीश निखील गुप्ता, न्यायाधीश महेश फडे, श्रीरामपूरचे न्यायाधीश बी.व्ही. बुर्‍हाडे, ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक शिंदे होते.
लोकन्यायालयात तडजोडीने वाद मिटविण्याचे आवाहन जिल्हा सत्र न्यायाधीश कुलकर्णी यांनी केले. लोकन्यायालयात पंचप्रमुख न्यायाधीशांसह प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, डॉ. मुरलीधर कराळे तसेच इतर कायदेतज्ज्ञांनी काम पाहिले. वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अशोक करडक यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Belvandi-Shirdi Dindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.