साकोरा परिसरात बैलजोडी चोरी

By Admin | Updated: May 18, 2014 00:12 IST2014-05-17T23:52:25+5:302014-05-18T00:12:09+5:30

साकोरा, दि. १७ : येथील नवादे श्विारात जाळीचा देव श्ेाजारील मळ्यात बांधलेल्या बैलजोडीची अज्ञान चोरट्यांनी चोरी केली आहे. संबंधित शेतकर्‍याचे ऐन शेती मशागतीच्या काळात मोठे नुकसान झाले आहे.

Belljodi theft in Sakura area | साकोरा परिसरात बैलजोडी चोरी

साकोरा परिसरात बैलजोडी चोरी

साकोरा, दि. १७ : येथील नवादे श्विारात जाळीचा देव श्ेाजारील मळ्यात बांधलेल्या बैलजोडीची अज्ञान चोरट्यांनी चोरी केली आहे. संबंधित शेतकर्‍याचे ऐन शेती मशागतीच्या काळात मोठे नुकसान झाले आहे.
अनेक शेतकरी आपली पाळीव जनावरे आता मळ्यातच बांधून ठेवतात. येथील शेकरी संजय मोतीराम बोरसे यांची ८0 हजाराची बैलजोडी व काही दुभती जनावरे काल मळ्यात होती. त्यांचे वडील सायंकाळी दूध घेऊन घरी आले. दुसर्‍या दिवशी सकाळी मळ्यात जाताच चोरीचा प्रकार उघडकीस आला. दोन्ही बैल पांढर्‍या रंगाचे असून, उभ्या शिंगची आहेत. तर दोघांची शेपटी काळी आहेत. बोरसे यांनी आसपास खूप तपास केला. मात्र ही जोडी न सापडल्यामुळे नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या परिसरात पाळीव जनावरे चोरट्याची टोळी कार्यरत असून दोन महिन्यांपूर्वी सरपंच संजय सुरसे यांची दुभती गाय चोरीला गेली. तिचा अजूनही तपास लागला नसून, पोलीसांनी या टोळीचा शोध लावावा अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

Web Title: Belljodi theft in Sakura area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.