रक्षाबंधनासाठी बेल्हा बाजारपेठ सजली

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:35+5:302015-08-26T23:32:35+5:30

बेल्हा : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनासाठी बेल्हा (ता. जुन्नर) येथील दुकाने विविधरंगी राख्यांनी सजली आहेत. डायमंड व स्टोन राख्यांना जास्त मागणी वाढली आहे.

Belga Bazar Market for Rakshabandh | रक्षाबंधनासाठी बेल्हा बाजारपेठ सजली

रक्षाबंधनासाठी बेल्हा बाजारपेठ सजली

ल्हा : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनासाठी बेल्हा (ता. जुन्नर) येथील दुकाने विविधरंगी राख्यांनी सजली आहेत. डायमंड व स्टोन राख्यांना जास्त मागणी वाढली आहे.
येथील भागात राख्यांचे मोठमोठे स्टॉल लागले आहेत. या वर्षी राख्यांचे भाव हे वाढलेले आहेत. येथील राख्यांचे विक्रेते अतुल गांधी यांनी सांगितले, की या वर्षी डायमंड, स्टोन न गोंडा राख्यांना विशेष मागणी वाढली असून, या राख्या महिला मोठ्या प्रमाणात खरेदी करत असून, त्या बाहेरच्या ठिकाणी पाठवितात. या राख्यांचे भावही जास्त असूनसुद्धा त्यांना मागणी जास्त आहे. सध्या लाल दोरी, स्टोन, मोती, कार्टून, मेटल, जयपूर पॅटर्न, चायना, लाईट, म्युझिक, जरदोसी वर्क, डायमंड इत्यादी असंख्य प्रकारच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध असून, अगदी राखी १० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
फोटो : रक्षाबंधन जवळ आल्याने विविधरंगी राख्यांची दुकाने बेल्हा येथे सजली असून, राख्यांच्या स्टॉलवर मोठ्या प्रमाणावर महिला आपल्या लाडक्या भावाला राखी घेताना.

Web Title: Belga Bazar Market for Rakshabandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.