वेगळ्या विदर्भाचे आमरण उपोषण मागे
By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:07+5:302014-12-25T22:41:07+5:30
नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीपासून फॉरवर्ड ब्लॉकतर्फे आमरण उपोषण करण्यात आले. उपोषणाची दखल घेऊन खासदार विजय दर्डा यांनी वेगळ्या विदर्भाचा आवाज राज्यसभेत पोहचविला. हे या आंदोलनाचे यश राहिले आहे. त्यामुळे सध्या हे आंदोलन मागे घेतले असून, मात्र भविष्यात हे आंदोलन अधिक आक्रमक करणार असल्याचा इशारा फॉरवर्ड ब्लॉकचे उपाध्यक्ष विदर्भवीर जांबूवंतराव धोटे यांनी पत्रपरिषदेत दिला. भाजपाने विदर्भाच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. आता ज्यांना विदर्भ हवा आहे, त्यांनी विदर्भात होणाऱ्या नेत्यांच्या सभेत वेगळ्या विदर्भाची घोषणाबाजी करून, जाब विचारावा, असे आवाहन केले. या आंदोलनात १५ कार्यकर्ते आमरण उपोषणात बसले होते. यावेळी अरुण वनकर, माया चवरे, मोसिन खान, नयना धवड आदी उपस्थित होते.

वेगळ्या विदर्भाचे आमरण उपोषण मागे
न गपूर : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीपासून फॉरवर्ड ब्लॉकतर्फे आमरण उपोषण करण्यात आले. उपोषणाची दखल घेऊन खासदार विजय दर्डा यांनी वेगळ्या विदर्भाचा आवाज राज्यसभेत पोहचविला. हे या आंदोलनाचे यश राहिले आहे. त्यामुळे सध्या हे आंदोलन मागे घेतले असून, मात्र भविष्यात हे आंदोलन अधिक आक्रमक करणार असल्याचा इशारा फॉरवर्ड ब्लॉकचे उपाध्यक्ष विदर्भवीर जांबूवंतराव धोटे यांनी पत्रपरिषदेत दिला. भाजपाने विदर्भाच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. आता ज्यांना विदर्भ हवा आहे, त्यांनी विदर्भात होणाऱ्या नेत्यांच्या सभेत वेगळ्या विदर्भाची घोषणाबाजी करून, जाब विचारावा, असे आवाहन केले. या आंदोलनात १५ कार्यकर्ते आमरण उपोषणात बसले होते. यावेळी अरुण वनकर, माया चवरे, मोसिन खान, नयना धवड आदी उपस्थित होते.