शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आश्वासनानंतर अण्णांचे उपोषण मागे, मुख्यमंत्र्यांनी पाजले लिंबूपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 6:40 AM

अण्णा हजारे यांच्या सात दिवसांच्या उपोषणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सांगता झाली. केंद्राने अण्णांच्या ११ मागण्या तत्त्वत: मान्य केल्या

विकास झाडे नवी दिल्ली : अण्णा हजारे यांच्या सात दिवसांच्या उपोषणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सांगता झाली. केंद्राने अण्णांच्या ११ मागण्या तत्त्वत: मान्य केल्या आहेत. या मागण्या सहा महिन्यांत पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा अण्णांनी मुख्यमंत्र्यांसमोरच दिला.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन केंद्र सरकार व अण्णा यांच्यात शिष्टाई करीत होते. पंतप्रधान कार्यालयाकडून एकेक मागणी तत्त्वत: मान्य केल्यानंतर अण्णांना भेटून ते माहिती देत. अण्णांच्या सर्व मागण्या आज मोघमच मान्य झाल्या. त्या केव्हा अंमलात येतील याचे ठोस आश्वासन मिळाले नाही. तरीही अण्णांनी ताणून न धरता उपोषण सोडण्याचे मान्य केले. केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी मान्य मागण्यांची यादी वाचून दाखवली.या होत्या अण्णांच्या मागण्या!शेतीमालाला उत्पादन खर्चाहून ५० टक्के अधिक भाव, शेतीवर अवलंबून असलेल्या ६० वर्षांवरील शेतकरी व मजुरांना दरमहा ५ हजार रुपये निवृत्तिवेतन, निवडणूक आयोगाप्रमाणेच कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता, लोकपालची त्वरित नियुक्ती व्हावी. लोकपालप्रमाणे राज्यांत सक्षम लोकायुक्त कायदा, त्यातील कमकुवत करणारे कलम ६३ व ४४मध्ये बदल या अण्णांच्या प्रमुख मागण्या होत्या. शिवाय मतपत्रिकेवर उमेदवाराचे रंगीत छायाचित्र, मतमोजणीसाठी टोटलायझर मशिनचा उपयोग आणि लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार याही मागण्या त्यांनी केल्या होत्या.कृषी अवजारांवरील जीएसटी तीन महिन्यांत ५ टक्क्यांवर आणला जाईल. लोकपालसाठी कालमर्यादा घालून घेण्यास सरकार तयार आहे. निवडणूक सुधारणांबाबत सरकार सकारात्मक आहे.. अशा आशयाचा पंतप्रधान कार्यालयाने दिलेला मसुदा अण्णांनी मंजूर केला. कृषिमूल्य आयुक्तांच्या स्वायत्ततेवर उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे.अण्णांना अशक्तपणाअशक्तपणामुळे अण्णा सकाळपासून व्यासपीठावर बसून होते. त्यांनी आपले भाषणही थोडक्यात आटोपले. केंद्राने असंवेदनशीलतेने आंदोलन हाताळल्यामुळे अण्णांविषयी सहानुभूतीची लाट निर्माण झाल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.मुख्यमंत्र्यांच्या दिशेने जोडा!मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण संपताना कार्यकर्त्यांनी ‘वंदे मातरम्’, ‘भारतमाता की जय’ या घोषणा सुरू केल्या. त्याचवेळीएक जोडा मुख्यमंत्र्यांच्या दिशेने भिरकावण्यात आला. परंतु तो कोणालाही लागला नाही. मुख्यमंत्री लगेच भाषण आटोपून व्यासपीठावरून निघून गेले. हा आंदोलनकर्ता राजस्थानचा होता. राजकुमार सोनी असे या आंदोलनकर्त्याचे नाव आहे.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस