शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ओबामांनी सांगितलं म्हणून मोदींनी पॅरिस जलवायू कराराला दिली मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 09:54 IST

पॅरिस येथे झालेला जलवायू कराराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यातील चर्चेचा मोठा खुलासा झाला आहे.

नवी दिल्ली - पॅरिस येथे झालेला जलवायू कराराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यातील चर्चेचा मोठा खुलासा झाला आहे. ओबामा यांचे जवळचे सहकारी बेंजामिन रोड्स यांनी सांगितले की, जलवायू कराराच्या मान्यतेसाठी तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा आणि अमेरिका यांच्या मार्गावरील भारत हा मोठा अडसर होता. रोड्स यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, ओबामा यांच्या सांगण्यावरुनच पंतप्रधान नरेंद्र मोदी जलवायू परिवर्तन करार करण्यासाठी तयार झाले. 

अमेरिकेचे विदेश मंत्री कुर्त कैंपबेल आणि भारतातील अमेरिकेचे माजी राजदूत रिचर्ड वर्मा यांच्यासोबत द टीलेव्स पॉडकास्ट ऑफ एशिया ग्रुपच्या कार्यक्रमामध्ये एका मुलाखतीत रोड्स यांनी तत्त्कालीन बराक ओबामा सरकार 2014 च्या अखेरीस चीनसोबत साम्यजंस्य करण्यासाठी यशस्वी राहिलं. ज्यामध्ये दोन्ही देशांमधील वाढतं तापमान कमी करण्याबाबत द्विपक्षीय उद्देशांची घोषणा करण्यात आली. रिचर्ड वर्मा यांच्या प्रश्नावर उत्तर देताना रोड्स यांनी सांगितले की, चीनसोबत आल्याने इतर देशांनीही पुढाकार घेतला. मात्र भारत जलवायू परिवर्तन करारासाठी तयार नव्हता. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 जानेवारी 2015 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बराक ओबामा यांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केले. ओबामा यांच्या सल्लागारांनीही अमेरिकेने भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करुन मोदींबरोबर वैयक्तिक संबंध मजबूत करण्याचा सल्ला दिला. बराक ओबामा यांनी सल्लागारांनी सांगितल्याप्रमाणे केले. 

पॅरिसमध्ये जलवायू परिवर्तन करारावेळी ओबामा आणि मोदी यांची भेट झाली. कोळशाचा वापर थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तयार नव्हते. मात्र ओबामा यांनी आश्वस्त केल्यानंतर मोदी जलवायू परिवर्तन करारासाठी तयार झाले. त्यानंतर भारतानेही पॅरिस जलवायू कराराला मान्यता दिली. 

काय आहे पॅरिस करार?जागतिक तापमानवाढीच्या प्रश्नांवरुन जगातील अनेक देश पॅरिसमध्ये एकत्र आले. जागतिक औद्योगीकरणामुळे एकदम ग्रीनहाउस गॅसेस खूप कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे तापमानवृध्दीदेखील होतच रहाणार आहे. यासाठी विकसित राष्ट्रांनी 100 बिलियन एवढी रक्कम नजिकच्या काळात गोळा करून विकसनशील आणि अविकसित राष्ट्रे यांच्यात या संदर्भातील सुधारणा करण्यासाठी देण्यात यावी असे ठरवले. परंतु यातील प्रत्येक सुधारणा कुठच्याही देशाला कायदे किंवा वचनबध्द करत नाही. म्हणजे ह्या कराराला काही आंतरराष्ट्रीय कायद्याचा बडगा नाही, कुठलीही बांधिलकी नाही. तरीदेखील येत असलेल्या वातावरण बदलाचे गांभीर्य लक्षात ठेवून एक पुढचे पाऊल म्हणून प्रत्येक देशाने हा करार मान्य केला आणि एक इतिहास घडवला. 

टॅग्स :ParisपॅरिसNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिका