शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नव्या राजकीय समीकरणांची नांदी; तिरंगी समीकरणांमुळे बहुतेक जागी तुल्यबळ लढती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 06:41 IST

तिरंगी लढतीत विजयाची हॅटट्रिक नोंदविण्याचे आव्हान एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीसमोर आहे.

असिफ कुरणे, लोकमत न्यूज नेटवर्कचेन्नई : तिरंगी लढतीत विजयाची हॅटट्रिक नोंदविण्याचे आव्हान एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीसमोर आहे. यंदा पारंपरिक प्रतिस्पर्धी अण्णाद्रमुकसोबत भाजपच्या तगड्या आव्हानाचा सामना द्रमुकला करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे चांगल्या जागा मिळवत अण्णाद्रमुक पक्षाची धुरा आपणच यशस्वीपणे सांभाळू शकतो हे सिद्ध करण्याचे दडपण माजी मुख्यमंत्री ईडापड्डी पलानीस्वामी यांच्यावर आहे. त्यामुळे तामिळनाडूतील लोकसभेची ही निवडणूक नव्या राजकीय समीकरणांना आयाम देणारी ठरणार आहे.

शुक्रवारी तामिळनाडूतील सर्व ३९ जागांवर एकाच टप्प्यात मतदान होत आहे. अण्णाद्रमुकचे महासचिव ई. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात डीएमडीके, एसडीपीआय व इतर पक्षांची आघाडीदेखील काही जागांवर तुल्यबळ लढती आहेत, तर पहिल्यांदाच स्वतंत्र लढणाऱ्या भाजपने पीएमके पक्षाशी युती करत आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रचारात द्रमुकने विकासाची कामे,केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आवाज उठवत आघाडी घेतली आहे, तर अण्णाद्रमुक पक्षाने पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात जोरदार तयारी केली आहे. 

२०२१ विधानसभेची आकडेवारीपक्ष    मिळालेल्या जागा    मतांची टक्केद्रमुक (एसपीए आघाडी)    १५९(द्रमुक १३३)    ३७.७०% अण्णाद्रमुक (एनडीए आघाडी)    ७५ (अण्णाद्रमुक ६६) ३३.३०%

२०१९ लोकसभा निवडणूकएसपीए आघाडी    ३८ (द्रमुक २०)    ५३.५१%एनडीए आघाडी    ०१ (अण्णाद्रमुक १)    ३०.५६%

एमआयएमचा अण्णाद्रमुकला पाठिंबा- निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी अण्णाद्रमुक पक्षासोबत आघाडी केली आहे. अण्णाद्रमुकने भाजपशी संबंध तोडून टाकले आहेत. - तसेच भविष्यात कसलीही आघाडी करणार नसल्याचे सांगत सीएए आणि एनआरसीला विरोध करण्याची ग्वाही अण्णाद्रमुुक नेतृत्वाने दिली असल्याने आपण त्यांना पाठिंबा देत असल्याचे ओवेसी यांनी सांगितले.

टॅग्स :Chennaiचेन्नईlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४