‘गोल्डन’ सुरुवात
By Admin | Updated: July 25, 2014 03:11 IST2014-07-25T03:11:17+5:302014-07-25T03:11:17+5:30
20 व्या राष्ट्रकुल स्पध्रेचा पहिला दिवस भारतासाठी गोल्डन ठरला. वेटलिफ्टिंगमध्ये संजीता खुमुकचाम हिने सुवर्णपदक तर साइखोम मिराबाई हिने रौप्यपदकावर नाव कोरले.

‘गोल्डन’ सुरुवात
ग्लासगो : 20 व्या राष्ट्रकुल स्पध्रेचा पहिला दिवस भारतासाठी गोल्डन ठरला. वेटलिफ्टिंगमध्ये संजीता खुमुकचाम हिने सुवर्णपदक तर साइखोम मिराबाई हिने रौप्यपदकावर नाव कोरले. ज्युदोतही नवजोत चना व सुशीला लिकमबम यांनी रौप्य मिळवले. कल्पना थोडमने ज्युदोतच कांस्यपदक पटकावले.
संजीताने दिले भारताला पहिले सुवर्ण
ग्लास्गो : खुमुकचाम संजीता चानू व सेखोम मीराबाई चानू यांनी 2क् व्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत पहिल्या दिवशी भारोत्ताेलन क्रीडा प्रकारात महिलांच्या 48 किलो वजन गटात अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदाकाचा मान मिळवित भारताचे पदकाचे खाते उघडले.
अनेक दिग्गज प्रतिस्पध्र्याच्या अनुपस्थितीत संजीताने 173 किलो (77 व 96) वजन पेलताना सुवर्ण तर मीराबाईने 17क् किलो( 75 व 95 किलो) वजन उचलताना रौप्य पदकाचा मान मिळविला. नायजेरियाची नकेची ओपारा एकूण 162 किलो(7क् व 92 ) वजन उचलत कांस्यपदकाची मानकरी ठरली.
संजीताला 175 किलो वजनाचा अगस्तीना नकेम नावाओकोलोच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रमाची बरोबरी साधता आली नाही. संजीताने स्नॅचमध्ये 77 किलो वजन पेलताना अगस्तीनाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रमाची बरोबरी साधली. तिने क्लीन अॅण्ड जर्कमध्ये 96 किलो वजल उचलले. स्नॅच स्पर्धेदरम्यान भारताचे वर्चस्व अनुभवायला मिळाले.
20 वर्षीय संजीता व 19 वर्षीय मीराबाई यांनी अनुक्रमे 77
व 75 किलो वजन उचलण्याचा पराक्रम केला. संजीताने स्नॅचमध्ये 72 किलो वजन उचलताना चांगली सुरुवात केली त्यानंतर तिने 77 किलो वजन उचलले. मीराबाईला पहिल्या प्रयत्नात 75 किलो वजन उचलता आले नाही, पण तिस:या प्रयत्नात मात्र ती यशस्वी ठरली. त्यानंतर ही लढत या दोन मणिपुरी खेळाडूंमध्ये होती. त्यात अखेर संजीताने बाजी मारली.
चाना, लिक्माबमला रौप्य
मणिपूरची 19 वर्षीय ज्युदोपटू सुशीला लिक्माबम व पंजाबचा 3क् वर्षीय नवज्योत चाना यांनी 2क् व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पधेत ज्युदोमध्ये आपापल्या गटात रौप्यपदकाचा मान मिळविला. कल्पना थोडम कांस्यपदकाची मानकरी ठरली. पंजाब पोलिसमध्ये कार्यरत असलेल्या चानाने 6क् किलो वजन गटात सुवर्णपदकाच्या
लढतीत इंग्लंडच्या एश्ले मॅकेंजी कडून पराभव तिला पत्करावा लागला. महिलांच्या 48 किलो गटात सुशिलाला स्कॉटलंडच्या किम्बर्ली रेनिक्सकडून पराभव पत्करून रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महिला विभागात 52 किलो वजन गटात कल्पना थोडमला तर पुरुषांच्या 66 किलो वजन गटात मनजित नंदल याला उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी रेपेचेज राऊंडमध्ये सरशी साधत कांस्यपदकाच्या आशा कायम राखल्या. कल्पना थोडमने मॉरिशसच्या ािस्टियन लेगेंटिलचा पराभव करीत कांस्यपदक पटकाविले. (वृत्तसंस्था)
सचिन मुख्य आकर्षण
येथे बुधवारपासून प्रारंभ झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत खेळाच्या व्यतिरिक्त इतर कारणांमुळे चर्चेत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या अधिकृत गीताच्या व्हिडिओमध्ये भारतीय राष्ट्रध्वज उलटा दाखविण्यात आला आहे.
या कार्यक्रमात भारतही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर एका संक्षिप्त व्हिडिओ क्लिपमध्ये झळकला. सचिनने युनिसेफचा ग्लोबल गुडविल अॅम्बेसिडर म्हणून जगातील बालकांचे जीवनमान उंचावण्यासाठी लोकांना वर्गणी देण्याचे आवाहन केले.
आजच्या स्पर्धा
बॅडमिंटन
मिश्र सांघिक प्राथमिक फेरी
दु.2.00 भारत विरूद्ध केनिया
जिम्नॅस्टिक
रिदमिक जिम्नॅस्टिक
वैयक्तिक ऑलराऊंड अंतीम
दु. 1.30 ते सायं. 5.30
हॉकी
पहिली फेरी भारत वि. वेल्स्
स. 9.00
ज्युदो
पुरूष (73 कि. गट, राऊंड ऑफ 32)
बलविंदर सिंग वि. एडसन मेडेइरा
81 किलो गट (राऊंड ऑफ 32)
विकेंदर सिंग वि. ओम्गा फाउदा
महिला (70 किलो, राऊंड ऑफ 16)
सुनिबाल हुईड्रोम वि. मेमोरी जिखाले
63 किलो (राऊंड ऑफ 60)
गरिमा चौधरी वि. फोपा बीबाइन
जलतरण
पुरूष 200 मीटर फ्रिस्टाईल (चौथी फेरी) : सजन प्रकाश
पुरूष 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक (तिसरी फेरी) : संदीप सेजवाल
मुष्टियुद्ध
पुरूष : 69 किलो गट : मनदीप जांगडा वि. आगुस्तो माथुलो
91 किलोगट : प्रवीण कुमार वि. हेंडरसन रोस
नेमबाजी
10 मीटर एअर पिस्तुल महिला क्वालीफिकेशन : (स. 8.45 वा.
मलाइका गोयल, हिना सिद्धू
स्कीट पुरूष क्वालीफिकेश : (स. 9 वा.)
बाबा बेदी, मैराज अहमद खान
स्कीट महिला क्वालीफिकेश
आरती सिंह राव : (स. 9 वा.)
10 मीटर एअर रायफल क्वॉलिफिकेशन : (सकाळी 10.30)
अभिनव बिंद्रा, रवि कुमार
टेबलटेनिस
महिला सांघिक :
भारत वि. केनिया
पुरूष सांघिक :
भारत वि. गयाना
भारताला धक्का
ग्लास्गो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला. अपंग-पॉवरलिप्टर सचिन चौधरी याची मागील महिन्यात राष्ट्रीय उत्तेजकद्रव्यविरोधी समिती (नाडा)ने घेतलेल्या चाचणीत तो दोषी आढळला आहे.
अखेरच्या क्षणी भारतीय चमूत सहभागी करण्यात आलेला चौधरी वडिलांच्या आजाराचे कारण सांगून ग्लास्गो सोडून गेला होता. मात्र, नाडाने घेतलेल्या चाचणीत दोषी आढळल्याने त्याने ग्लास्गो सोडण्याचे मुख्य कारण बाहेर आले आहे. ही चाचणी विदेशात जाण्यापूर्वी घेण्यात आली होती. या संघातील एका खेळाडूने गोपनीयतीच्या अटीवर सांगितले, की सचिनने खरोखरंच उत्तेजकद्रव्य घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
देश सुवर्ण रौप्य कास्य
इंग्लड432
ऑस्ट्रेलिया214
भारत131
स्कॉटलंड111
न्यूङिालंड101