प्रगटदिन उत्सवाला सुरूवात
By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:37+5:302015-02-11T23:19:37+5:30
शहरात प्रगट दिन उत्सवाला सुरुवात

प्रगटदिन उत्सवाला सुरूवात
श रात प्रगट दिन उत्सवाला सुरुवात नागपूर : श्री संत गजानन महाराज यांच्या १३७ व्या प्रगटदिन उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्त शहरातील गजानन महाराजांच्या मंदिरांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. काही मंदिरात आज पालखी सोहळ्याने प्रगटदिनाला सुरुवात झाली. महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. काही मंदिरासह ठिकठिकाणी महाप्रसाद वितरित करण्यात आला. रेशीमबाग, संत गजानन महाराज श्रद्धास्थानसंत गजानन महाराज श्रद्धास्थानाच्या ५१ व्या सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारोहाला प्रगटदिनापासून सुरुवात झाली. यानिमित्त महाराजांच्या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शेगावप्रमाणे या श्रद्धास्थानावर भाविकांची श्रद्धा आहे. रथयात्रेचा शुभारंभ सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे यांच्याहस्ते झाला. यावेळी नासुप्रचे रविंद्र भोयर, आ. सुधाकर कोहळे व संतकवी कमलासूतबाबा उपस्थित होते. गण गण गणात बोतेच्या गजरात संपूर्ण रेशीमबाग परिसर दुमदुमला होता. रथयात्रेचे भाविकांनी ठिकठिकाणी स्वागत के ले. श्रद्धास्थानात फुलांची सेज करण्यात आली होती. महाराजांचा लघुरुद्राभिषेक करण्यात आला. दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. श्री संत गजानन महाराज मंदिर, बालाजीनगर बालाजीनगर विस्तार येथे महाराजांच्या प्रगटदिन उत्सवाला सुरुवात झाली. विश्वशांती मानव सेवाश्रमातर्फे हा उत्सव साजरा करण्यात येतो. पहाटे ६ वाजता काकड आरती झाली. त्यानंतर घटस्थापना, कळस अनावरण व ब्रह्मदंडपूजन मोरेश्वर काकडे व डॉ. ओंकार लाडूकर यांच्याहस्ते करण्यात आले. भागवतकार विश्वनाथ आसेगावकर महाराजांच्या भागवत कथेला सुरुवात झाली. विश्वशांती महिला भजन मंडळ व जय माँ भगवती भजन मंडळाचे भजन झाले. तर हभप विश्वनाथ महाराज आसेगावकर यांचे कीर्तन झाले. दक्षिण नागपुरातील महाराजांचे हे सर्वात मोठे मंदिर आहे. महाराजांच्या मूर्तीची आज आकर्षक सजावट करण्यात आली होती. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले.