शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
3
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
5
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
6
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
7
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
8
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
9
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
10
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
11
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
12
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
13
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
14
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
15
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
16
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
17
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
18
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
19
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
20
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?

बॉसला विनवणी करून घेतली सुट्टी, स्टेडियमजवळ पोहोचली अन् देवी परत आलीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:04 IST

Bangalore stampede news today: बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला. मोफत पास वाटले जात असल्याच्या एक अफवेने देवीचाही जीव घेतला. 

Bangalore stampede News Update: विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूची ती खूप मोठी चाहती होती. बंगळूरूचे सामने बघायला जायची. आरसीबीने १८ वर्षांनी आयपीएल जिंकल्यामुळे ती खूप आनंदतही होती. त्यामुळे आरसीबीची विजयी रॅली आणि स्टेडियममध्ये होणाऱ्या सेलिब्रेशनचं तिला साक्षीदार व्हायचं होतं. पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. विनवणी करून तिने बॉसकडून काही तासांसाठी सु्ट्टी घेतली आणि गेली. पण, ती परतलीच नाही. त्या गर्दीत तिचाही जीव गेला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आरसीबीच्या आयपीएल विजयाच्या आनंदोत्सावाला गालबोट लागले. बंगळुरूमध्ये बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या विजयी रॅली नंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर सेलीब्रेशन झाले. पण, स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दी झाली. त्यात एक अफवा उडाली आणि तब्बल ११ जणांचा जीव गेला. त्यात एक होती, देवी. 

काही तासांची सुट्टी घेऊन गेली अन्...

देवी बंगळुरूतील एका आयटी कंपनीमध्ये कामाला होती. आरसीबीची विजयी रॅली बघण्यासाठी तिने बॉसला विनवणी केली. त्यानंतर काही तासांची तिला सुट्टी मिळाली. लॅपटॉप डेस्कवर तसाच ठेवून दुपारी २.३० वाजता चिन्नास्वामी स्टेडियमकडे निघाली. स्टेडियमच्या बाहेर आल्यानंतर ती गर्दी शिरली. त्याचवेळी मोफत पास वाटल्या जात असल्याची अफवा उडाली आणि चेंगराचेंगरी झाली. यात ११ जणांचा जीव गेली, त्यात देवीही होती. 

क्रिकेटप्रेमी देवीने तिकीट मिळवण्याचा केला होता प्रयत्न

देवीच्या मृत्यूच्या घटनेने तिच्या ऑफिसमध्ये सगळ्यांनाच धक्का बसला. तिचा लॅपटॉप डेस्कवर तसाच आहे. ऑफिसमधून निघताना देवी तिच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना म्हणाली होती, 'मी स्टेडियमला मेट्रोने जाणार आहे.' हेच तिचे शेवटचे शब्द होते. 

वाचा >>'...म्हणून झाली चेंगराचेंगरी, RCB च्या विजयोत्सवासाठी झाली होती ८ लाख लोकांची गर्दी'; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा मोठा दावा! 

देवीला क्रिकेटची आवड होती. बंगळुरूमध्ये आल्यानंतर ती सामने बघायला जायची. आरसीबीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी तिने तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण तिकीट मिळालं नाही. 

देवी ऐनवेळी स्टेडियमजवळ आली. ती गर्दीत असतानाच एक अफवा उडाली की, मोफत पास दिले जात आहेत. गर्दी अनियंत्रित झाली आणि अनेकजण गर्दीच्या पायाखाली आले. यात ११ जणांचा मृत्यू झाला. आनंदात ऑफिसमधून निघालेली देवीही याच चेंगराचेंगरीत गेली. ४० हजार क्षमता असलेल्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सोहळा झाला. तो बघण्यासाठी स्टेडियमबाहेर तब्बल अडीच ते तीन लाख लोकांनी गर्दी केली होती. 

टॅग्स :Bengaluru Stampedeबंगळुरुमध्ये चेंगराचेंगरीStampedeचेंगराचेंगरीRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरIPL 2025इंडियन प्रिमियर लीग २०२५