शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भीक मागणे गुन्हा नाही, तरी भिका-यांना पकडणे गरजेचे, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 01:38 IST

गरिबीने लाचार होऊन भीक मागणे हा गुन्हा असू नये, हे मान्य केले तरी सार्वजनिक ठिकाणी भीक मागणा-या व्यक्तीला अटक करून ताब्यात घेण्याची तरतूद कायद्यात हवी, अशी भूमिका केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात मांडली आहे.

नवी दिल्ली : गरिबीने लाचार होऊन भीक मागणे हा गुन्हा असू नये, हे मान्य केले तरी सार्वजनिक ठिकाणी भीक मागणा-या व्यक्तीला अटक करून ताब्यात घेण्याची तरतूद कायद्यात हवी, अशी भूमिका केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात मांडली आहे.भीक मागणे हा गुन्हा ठरविणारा कायदा रद्द केला जावा आणि भिकाºयांनाही मुलभूत मानवी हक्क आहेत हे मान्य करूनही त्यांच्या पोटापाण्याची व निवाºयाची व्यवस्था केली जावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका हर्ष मंदर आणि कर्णिका सहानी यांनी केली आहे. तेव्हा केंद्र सरकारने ही भूमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर केले.या भूमिकेवर न्यायाधीशांनी विचारले, कोणी स्वेच्छेने किंवा दुसºया कोणी जबरदस्ती केली म्हणून भीक मागतो का? इतर काही करणे शक्य असूनही ठरवून भीक मागणारा भिकारी कधी कोणी पाहिला आहे का? असा सवाल केंद्राच्या वकिलांना केला.यावर सरकारने म्हटले की, गरिबीने लाचार होऊन कोणी भीक मागत असेल तर त्याला गुन्हेगार ठरविले जाऊ नये, हे बरोबर आहे. पण त्याला भीक मागण्यास भाग पाडले का, याची शहानिशा करण्यासाठी ताब्यात घेण्याची तरतूद कायद्यात हवी. भिक्षा प्रतिबंधक कायद्यातील बदलासाठी राज्य सरकारांचे मत घेणे गरजेचे आहे. या प्रकरणावर उच्च न्यायालयात ९ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होईल.सर्वांत जुना कायदा मुंबईचादेशभर लागू होईल असा केंद्राचा भिक्षाप्रतिबंधक कायदा नाही. पूर्वीच्या मुंबई प्रांतिक सरकारने १९५९ मध्ये केलेला ‘बॉम्बे प्रीव्हेंशन आॅफ बेगिंग अ‍ॅक्ट’ हा सर्वात जुना व प्रमाणभूत कायदा आहे.बहुतांश राज्यांनी एक तर हाच कायदा स्वीकारला किंवा त्याआधारे कायदे केले. यानुसार भीक मागणे शिक्षापात्र गुन्हा आहे. त्यात पहिल्या गुन्ह्यासाठी तीन वर्षे व पुन्हा केलेल्या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा आहे. 

टॅग्स :GovernmentसरकारIndiaभारतSupreme Courtसर्वोच्च न्यायालय