गोमांस खाणाऱ्यांनो पाकमध्ये चालते व्हा!

By Admin | Updated: May 23, 2015 00:09 IST2015-05-23T00:09:17+5:302015-05-23T00:09:17+5:30

ज्यांना गोमांस खाण्याची इच्छा असेल त्या सर्वांनी पाकिस्तानात चालते व्हावे

Beers eaters go to Pakistan! | गोमांस खाणाऱ्यांनो पाकमध्ये चालते व्हा!

गोमांस खाणाऱ्यांनो पाकमध्ये चालते व्हा!

नवी दिल्ली : ज्यांना गोमांस खाण्याची इच्छा असेल त्या सर्वांनी पाकिस्तानात चालते व्हावे, असे ठणकावत केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी गुरुवारी गोवंश हत्याबंदीचे प्रभावीपणे समर्थन केले. दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नक्वींचे वक्तव्य असमर्थनीय असल्याचे स्पष्ट केले.
‘हा नफा आणि तोट्याचा प्रश्न नसून, श्रद्धा व आस्थेचा मुद्दा आहे. हा हिंदूंसाठी अतिशय संवेदनशील असा मुद्दा आहे,’ असे नकवी म्हणाले. एका वृत्त वाहिनीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘गोमांस न खाल्ल्यामुळे जर कुणी मरत असतील तर ते पाकिस्तान वा अरब देशांत किंवा जगाच्या पाठीवर ज्या देशांत गोमांस उपलब्ध आहे, त्या कोणत्याही देशांत जाऊ शकतात,’ असे नकवी यांनी स्पष्ट केले.
मुस्लिमांचाही गोमांस खाण्याला विरोध असल्याचा दावा नकवी यांनी केला. यावेळी नकवी यांच्या समोर एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी बसले होते.

‘एक हिंदू म्हणून मी गोमांस खाल्ले आहे व यापुढेही गोमांस खाणार आहे,’ असे निक्षून सांगत सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी नकवी यांच्यावर उपरोधिक टीकास्त्र सोडले. जगातील ९० टक्के लोक गोमांस खातात. मग ते सर्व पापी आहेत काय? असा सवाल त्यांनी केला.

Web Title: Beers eaters go to Pakistan!