मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारत भिकारी होता - भाजपा नेता बरळले

By Admin | Updated: October 4, 2015 09:34 IST2015-10-04T09:34:14+5:302015-10-04T09:34:40+5:30

नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारत हा भिकारी देश होता असे वादग्रस्त विधान मध्यप्रदेशमधील भाजपा नेते नंदकुमार चौहान यांनी केले आहे.

Before becoming the Prime Minister of India, India was beggar - BJP leader Barela | मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारत भिकारी होता - भाजपा नेता बरळले

मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारत भिकारी होता - भाजपा नेता बरळले

 

ऑनलाइन लोकमत 
भोपाळ, दि. ४ - नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारत हा भिकारी देश होता असे वादग्रस्त विधान मध्यप्रदेशमधील भाजपा नेते नंदकुमार चौहान यांनी केले आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून विदेशातील दिग्गज नेते भारताचा आदर करु लागले आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. 
मध्यप्रदेशमधील खुरई येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार चौहान यांनी मोदींचे कौतुक करताना मुक्ताफळेच उधळली. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारत भिकारी देश होता. पण मोदी सत्तेवर आल्यापासून भारताची प्रतिमा बदलली आहे असे त्यांनी म्हटले आहे. तर शिवराज सिंह यांनी मध्यप्रदेशमधील साडे सात कोटीहून अधिक लोकांच्या आयुष्यात आनंद पसरवला आहे असे त्यांनी नमूद केले. 
नंदकुमार सिंह यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी शिक्षकांना चणे फुटाणेवाले संबोधित करुन वाद निर्माण केला होता. 

Web Title: Before becoming the Prime Minister of India, India was beggar - BJP leader Barela