विदर्भ-हिंदी विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाची भाषा बनावी

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:30+5:302015-02-15T22:36:30+5:30

हिंदी विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाची भाषा बनावी

Become a language of Vidarbha-Hindi science and information technology | विदर्भ-हिंदी विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाची भाषा बनावी

विदर्भ-हिंदी विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाची भाषा बनावी

ंदी विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाची भाषा बनावी
देवेंद्र फडणवीस : २५ व्या अ़भा़ राष्ट्रभाषा प्रचार संमेलनाचे उद्घाटन
फोटो-15६ँस्रँ01
कॅप्शन-संमेलनाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अतिथी.

वर्धा : हिंदी ही भाषा साहित्य व संस्कृतीपर्यंतच मर्यादित न राहता तिला आधुनिक विज्ञानाची जोड देत माहिती व तंत्रज्ञानाची भाषा म्हणून विकसित करण्याची आवश्यकता आहे़ मातृभाषेमध्ये चिनी भाषेनंतर जगात सर्वाधिक हिंदी बोलल्या जाते. यामुळे हिंदीच्या प्रचार व प्रसारासाठी नवीन माध्यमांचा प्रभावीपणे वापर व्हावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले़
येथील राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या हिंदीनगर परिसरात आयोजित २५ व्या अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रसार संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी साहित्यिक तसेच समीक्षक डॉ़ सूर्यप्रकाश दीक्षित होते़ प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रामदास तडस, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, आ़ डॉ़ पंकज भोयर, राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रधानमंत्री डॉ़ अनंतराम त्रिपाठी, स्वागताध्यक्ष सूर्यप्रकाश चौधरी, प्रचारमंत्री डॉ़ हेमचंद्र वैद्य यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
नागपूर येथे जागतिक हिंदी साहित्य संमेलन आयोजनाचा मान मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल़ यासाठी राष्ट्रभाषा समितीने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले़ पूर्वोत्तर राज्यातील विद्यार्थी राष्ट्रभाषा प्रचार समितीत येऊन हिंदी शिकतात आणि त्याचा प्रचारही करतात़ समितीला शासनातर्फे संपूर्ण मदत व सहकार्य देण्याची ग्वाही देतानाच रामप्रसाद बिसमिल्लाह यांची सुप्रसिद्ध काव्यरचना सादर करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणाचा समारोप केला़
अध्यक्षीय भाषणात डॉ़ दीक्षित यांनी हिंदीच्या विकासासोबतच संपूर्ण जगात प्रसार व प्रचारासाठी सहकार्याची अपेक्षा करीत देशाला जोडणाऱ्या सेतूचे काम हिंदी भाषा करत असल्याचेही म्हटले. पुरोहित यांनी हिंदीला राष्ट्रभाषेचा सन्मान मिळविण्याकरिता सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. दक्षिणेतसुद्धा हिंदीचा प्रचार व प्रसाराचे काम राष्ट्रभाषा प्रचार समितीतर्फे सुरू असून भाषेचा संकोच न करता सर्वांनीच ही भाषा आत्मसात करावी, असेही ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)
चौकट
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
४देशातील नामवंत साहित्यिक डॉ़ सूर्यप्रसाद दीक्षित, डॉ़ चित्तरंजन मिश्र, डॉ़ दामोदर खडसे, डॉ़ राम आहाद चौधरी, डॉ़ शंकरलाल पुरोहित, डॉ़ मफतलाल पटेल, डॉ़ देवराज आदी मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला़

Web Title: Become a language of Vidarbha-Hindi science and information technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.