शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलमुळे मुलांना 30 शब्दही लिहिणे कठीण; पालकांना लागली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 06:52 IST

गाेष्टी तर आठवतात, पण मांडण्यात अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना काळात ऑनलाइन अभ्यासामुळे मुलांना मोबाइलचे लागलेले व्यसन धोकादायक ठरत आहे. याचा परिणाम म्हणजे आता मुलांना शिक्षक जे शिकवतात त्यावर तसेच विषय समजून घेताना त्यावर लक्ष केंद्रित करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुलांना गोष्टी आठवतात पण ३० शब्दही लिहिणे कठीण जात असल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत.

अनेक लहान मुले अशी आहेत ती अतिशय उत्तम विचार व्यक्त करतात, पण ते त्या गोष्टी मांडू शकत नाहीत. यामुळे त्यांच्यावर मानसिक दडपण तर वाढत आहेच शिवाय त्यांना परीक्षेत चांगले मार्कही मिळत नाहीत. बहुतांश मुलं मोबाइलमध्ये बोलून गोष्टी शोधतात, यामुळे ते लिहिण्यापासूनही दूर जात असल्याचे समोर आले आहे.

पाच ते आठ वर्षांच्या मुलांना केवळ दहा ते तीस शब्दांची उत्तरे लिहिण्यात अडचण येत आहे. गणित सोडवणे, इंग्रजी लेखन आणि हिंदी या विषयात त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. हे त्यांच्या हातात मोबाइल दिल्यामुळे झाल्याचे परिणाम आहेत. मुले फक्त सरावानेच स्पष्ट, चांगले लिहायला शिकतात. जितका सराव जास्त तितके लेखन चांगले होईल,असे मत बरखा जैन या शिक्षिकेने व्यक्त केले.

मुले लिहिताना बोटात दुखत असल्याची तक्रार करीत आहेत. जास्त कीबोर्ड वापरल्याने किंवा चार ते पाच पाने लिहिल्याने त्यांचे हात दुखायला लागतात. पेन वा पेन्सिल खूप घट्ट धरल्यानेही नसांमध्ये तणाव निर्माण होतो. सरावाने सर्वकाही हळूहळू बरोबर होते. - डॉ. रजत भार्गव, फिजिओथेरपिस्ट 

केस १ : कुनिका (वय ८)

चौथीत शिकते. सर्व विषयांची उत्तरे तोंडपाठ आहेत. तरीही तिला परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. पालकांनी उत्तरपत्रिका पाहिली असता अनेकांची उत्तरे तिने बरोबर लिहिलेली नसल्याचे लक्षात आले. हस्ताक्षर देखील खूप खराब होते जे वाचणे कठीण होते.

केस २ : आस्था (१२)

हिला बऱ्याच गोष्टी आठवतात. लिहिताना बोटात ताण आल्याने लिहिणे कमी होऊ लागले. याला कार्पल टनल सिंड्रोम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.अल्ट्रासाऊंड आणि टेन्सने तपासल्यानंतर तो औषधांनी बरा झाला.

पालकांनी काय करायला हवे?

n मुलांना पत्र लिहिण्यास किंवा कथा लिहिण्यास सांगा.n एखाद्या ठिकाणाचा वा गोष्टीचा अनुभव लिहून दाखवा.n कविता व कथा लिहायला लावा.n मुलांना एखाद्या विषयाबद्दल काय वाटते ते लिहा.n लिहिण्यास सोयीस्कर पेन आणि पेन्सिल द्या.

टॅग्स :MobileमोबाइलHealthआरोग्य