सुंदर शहराला फोर-जी चे ग्रहण!..जोड आहे.

By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:36+5:302015-08-03T22:26:36+5:30

The beautiful city has four-eclipse! .. There is a pair. | सुंदर शहराला फोर-जी चे ग्रहण!..जोड आहे.

सुंदर शहराला फोर-जी चे ग्रहण!..जोड आहे.

>दुर्घटनेचा धोका : पथदिव्यांच्या खांबावर उघड्यावर केबल
नागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात विकासाच्या विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. परंतु यात रिलायन्स कंपनीने शहराच्या काही भागातील पथदिव्यांच्या खांबावर फोर - जी केबल टाकल्याने संुदरतेला ग्रहण लागले आहे.
केबल टाकण्यासाठी आधी कंपनीने शहरात ठिकठिकाणी खोदकाम केले. नागरिकांच्या विरोधानंतर मनपा प्रशासनाने कठोर भूमिका घेत खोदकामावर मर्यादा आणल्या. परंतु पथदिव्यांच्या खांबावर टाकलेला केबल खाली झुकल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
पूर्व- पश्चिम व उत्तर-दक्षिण भागातील प्रमुख मार्गावर पथदिव्यांच्या खांबावर केबल टाक ण्यात आले आहे. मार्गाच्या दुभाजकावरून केबल गेल्याने व एका चौकातून दुसऱ्या चौकाकडे वळण घेतल्यानंतर काही ठिकाणी केबल खाली झुकलेले आहे. त्यामुळे वाहन चालकांना अनेकदा अडचणीचा सामना करावा लागतो.
टाकण्यात आलेले केबल डिसेंबर २०१५ पर्यंतच राहणार आहे. त्यानंतर हटविण्यात येईल, अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली. फोर जी नेटवर्कसाठी भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण होताच पथदिव्यावरील केबल हटविले जाणार आहे. यामुळे कोणताही अडथळा होत नाही. जेथे केबल खाली झुकलेले आहे, ते तातडीने दुरुस्त केले जातात, असा दावा रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
भूमिगत केबलचे काम ठप्प
रिलायन्स कंपनीने शहरात फोर -जी नेटवर्कसाठी भूमिगत केबल टाकण्याचे काम हाती घेतले होते. परंतु ठिकठिकाणी खड्डे खोदल्याने याला नागरिकांनी विरोध दर्शविला. नागरिकांचा वाढता रोष विचारात घेता मे महिन्यात खड्डे खोदण्याचे काम थांबविण्यात आले. तसेच ८६ खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार खड्डे बुजवण्यात आले. तूर्त पुढील कामासाठी मनपाकडून अनुमती मिळालेली नाही. पावसाळ्यानंतर अनुमती मिळण्याची शक्यता आहे. कंपनी मनपाला ६७५ प्रती मीटर दराने शुल्क देणार आहे. १४४ कि.मी. लांबीची लाईन टाकली जाणार आहे.

Web Title: The beautiful city has four-eclipse! .. There is a pair.