शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

इन्कम टॅक्स वेळेत भरणाऱ्यांना रेल्वे, विमानतळांवर मिळणार 'स्पेशल ट्रिटमेंट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 11:53 IST

मोदी सरकार विशेष प्राधान्य देण्याच्या विचारात

नवी दिल्ली: प्रामाणिकपणे आयकर भरणाऱ्या नागरिकांना खास गिफ्ट देण्याचा विचार मोदी सरकारकडून सुरू आहे. कर भरणा करताना सातत्य राखणाऱ्या व्यक्तींना अनेक सुविधांमध्ये प्राधान्य दिलं जाऊ शकतं. वेळेवर कर भरणाऱ्यांना विमानतळ, रेल्वे स्थानकं आणि टोल नाक्यांवर विशेष सवलत मिळू शकते. या ठिकाणी प्रामाणिकपणे कर देणाऱ्यांना रांगेत उभं राहावं लागणार नाही. प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर भरणाऱ्यांचा असा सन्मान करण्याचा विचार सध्या सरकारकडून सुरू आहे. मात्र अद्याप याबद्दल अंतिम निर्णय झालेला नाही. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना विविध सेवांमध्ये विशेष प्राधान्य देण्याचा विचार आयकर विभागाकडून सुरू आहे. अशा करदात्यांना रेल्वे स्थानकं, विमानतळ, टोलवसुली केंद्रांवर विशेष सवलत दिली जावी, यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर आयोग प्रयत्नशील आहे. पीटीआयनं या वृत्तसंस्थेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. याबद्दलच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यावर तो पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर तो मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल. प्रामाणिकपणे कर भरणा करणाऱ्यांचा सन्मान करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी नियमितपणे कर भरणाऱ्यांना एक विशिष्ट नंबर देण्यात येईल किंवा त्यांच्या पॅन क्रमांकाचा समावेश विशेष श्रेणीत केला जाईल. गेल्या वर्षी आयकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मोदींनी याचा उल्लेख केला होता. सरकारी सेवांमध्ये सुधारणा व्हायला हव्यात, असं मत मोदींनी त्यावेळी व्यक्त केलं होतं. याशिवाय प्रामाणिक करदात्यांना विविध सेवा आणि सुविधांमध्ये प्राधान्य देण्याचा विचारदेखील पंतप्रधानांनी मांडला होता.  

टॅग्स :Airportविमानतळtollplazaटोलनाकाrailwayरेल्वेIncome Taxइन्कम टॅक्सNarendra Modiनरेंद्र मोदी