बीमलाईट बंदीचा पुन्हा आदेश
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:34+5:302015-09-07T23:27:34+5:30
पुणे : आकाशात प्रकाशझोत सोडणारे दिवे (बीमलाईट) लावण्यास पोलिसांनी बंदी केलेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दहीहंडीच्या दिवशी अनेक मंडळांनी बीमलाईटचा सर्रास वापर केल्याचे दिसले. त्यापार्श्वभुमीवर पोलिसांना सोमवारी बीमलाईट बंदीचा आदेश पुन्हा काढावा लागला.

बीमलाईट बंदीचा पुन्हा आदेश
प णे : आकाशात प्रकाशझोत सोडणारे दिवे (बीमलाईट) लावण्यास पोलिसांनी बंदी केलेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दहीहंडीच्या दिवशी अनेक मंडळांनी बीमलाईटचा सर्रास वापर केल्याचे दिसले. त्यापार्श्वभुमीवर पोलिसांना सोमवारी बीमलाईट बंदीचा आदेश पुन्हा काढावा लागला.आकाशात सोडण्यात येणार्या प्रखर दिव्यांचा त्रास होत असल्याची तक्रारी वैमानिकांनी केली होती. याची दखल घेत विमानतळ प्रशासनाने पोलिस आयुक्तांकडे याची तक्रार केली. त्यावर पोलिसांनी लोहगाव विमानतळ परिसरात १५ किलोमीटरपर्यंत रात्रीच्यावेळी बीमलाईट लावण्यास बंदी केली होती. परिसरातील मॉल, हॉटेलचालकांना असे दिवे न लावण्याच्या नोटीसाही दिल्या होत्या. तसेच सर्व पोलिस ठाण्यांना याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. याबाबत वेळोवेळी संबंधितांना कळविलेही जाते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरात बीमलाईटचा मोठा वापर होत आहे. दहिहंडीच्या रात्री अनेक भागात बीमलाईट लावण्यात आले होते. हे लक्षात आल्यानंतर सह पोलिस आयुक्तांनी सोमवारी पुन्हा बीमलाईटवरील बंदीचा आदेश काढला. हा आदेश दोन महिन्यांसाठी काढण्यात आला आहे.-----------