शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

हायवे असो, विमानतळ असो की रेल्वे..; पायाभूत सुविधांवर सरकारचे विशेष लक्ष, पाहा आकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 18:22 IST

'राष्ट्रीय महामार्गांचे जाळे 1.6 पटीने वाढले, 97 टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण, 158 विमानतळांवर विमानसेवा सुरू'

नवी दिल्ली: केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार आल्यापासून देशभरातील पायाभूत सुविधांमध्ये बरीच प्रगती झाली आहे. यातच आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एक महत्वाची माहिती दिली. लोकसभेत बोलताना ते म्हणाले की, मोदी सरकार लोकांचे जीवन सुकर करण्यासाठी पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्चात सातत्याने वाढ करत आहे. चालू आर्थिक वर्षासाठी 11.11 लाख कोटी रुपयांचे भांडवली खर्चाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत.

पंकज चौधरी पुढे म्हणाले की, सरकारचा भांडवली खर्च 2021-22 मधील 5 लाख कोटी रुपयांवरून 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात 11.11 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. मोदी सरकारचे लक्ष चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आहे. गेल्या 10 वर्षांत देशातील रस्ते, विमानतळ आणि रेल्वे क्षेत्रात लक्षणीय सुधारणा झाली आहे. यामुळे लोकांचे जीवन अधिक सोपे आणि सोयीस्कर झाले आहे.

राष्ट्रीय महामार्गांचे जाळे 1.6 पटीने वाढलेराष्ट्रीय महामार्गांचे जाळे 1.6 पटीने वाढले आहे. 2014 मध्ये 91,287 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते, जे नोव्हेंबर 2024 पर्यंत 1,46,195 किमी पर्यंत वाढले आहेत. भारतमाला प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात 34,800 किमी राष्ट्रीय महामार्ग बांधले जाणार आहेत. त्यापैकी 26,425 किलोमीटरचे काम देण्यात आले आहे, तर 18714 किमी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. देशातील कार्यरत विमानतळांची संख्या दुपटीने वाढली आहे. 2014 मध्ये 74 विमानतळांवरून उड्डाणे सुरू होती, तर 2024 मध्ये देशातील 158 विमानतळांवरून विमानसेवा सुरू होणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

97 टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण रेल्वेबाबत पंकज चौधरी म्हणाले, 97 टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे. रस्ते, रेल्वे आणि हवाई नेटवर्कच्या बळकटीकरणामुळे देशातील आर्थिक विकासाचा वेग तर वाढला आहेच, पण स्थानिक पातळीवर मूलभूत सुविधांमध्येही सुधारणा झाली आहे आणि त्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद