शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 06:08 IST

खेळामध्ये यशस्वी कारकीर्द घडवायची असेल, तर प्रत्येकाने सर्वांत आधी मनातला आवाज ओळखायला शिकावे आणि स्वतःला समजून घ्यावे, असा मार्मिक सल्ला व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी उदयोन्मुख खेळाडूंना दिला.

पुणे : 'परिस्थिती कशीही असो, कितीही संकटे समोर असोत. त्याला पाठ दाखवून पळू नका. तिच्याकडे संधी म्हणून बघा. त्याचा सामना करा. तसेच यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वतः प्रती प्रमाणिक राहा,' असा सल्ला माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी नवोदितांना दिला. क्रिकेटने आपल्याला आयुष्य कसे असते ते शिकवले हे सांगायलाही ते विसरले नाहीत.खेळामध्ये यशस्वी कारकीर्द घडवायची असेल, तर प्रत्येकाने सर्वांत आधी मनातला आवाज ओळखायला शिकावे आणि स्वतःला समजून घ्यावे, असा मार्मिक सल्ला व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी उदयोन्मुख खेळाडूंना दिला.यावेळी महाराष्ट्र रणजी संघाचे

माजी कर्णधार सुरेंद्र भावे यांनी ५० वर्षीय लक्ष्मण यांची मुलाखत घेतली. त्यावेळी लक्ष्मण यांनी आपली क्रिकेट कारकीर्द उलगडून दाखविली. त्याचसोबत क्रिकेटने आपल्या आयुष्यात कसे धडे दिले तो प्रवासही उलगडला.'लहानपणापासूनच मला क्रिकेटची आवड होती. माझे आई-वडील डॉक्टर होते. क्रिकेट निवडण्यासाठी त्यांनी मला पाच वर्षे दिली. या पाच वर्षांत यश मिळाले नाही, तर मलाही वैद्यकीय पेशाकडे वळावे लागणार होते. मात्र, मी मेहनत घेतली. मी किती धावा केल्या हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे नव्हते. मी माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती मेहनत घेत होतो, याला कुटुंबाने पाठिंबा दिला.'

बिल्कूल खचून जाऊ नकाआपल्या आयुष्यातील अनेक घटनांचे उदाहरण देऊन त्यांनी उपस्थितांना खचून न जाण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, माझे रणजी पदार्पण निराशाजनक होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही मला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. मात्र, आयुष्यात नो-बॉल मिळतोच. म्हणजे जीवनदान मिळतेच. फक्त संधीचा फायदा घेता आला पाहिजे.खेळाडूंचे कौशल्य पहावेनिवड समितीला सल्ला देताना ते म्हणाले, की खेळाडूंमधील कौशल्य बघायला शिकले पाहिजे. तेंडुलकरसारख्या व्यक्ती आयुष्यात होत्या. त्यामुळे कारकीर्द घडली. लक्ष्मण यांनी १३४ कसोटींत ४५.९७च्या सरासरीने ८७८१ धावा केल्या. ते ८६ वन-डे सामनेही खेळले. त्याचबरोबर २६७प्रथम श्रेणी सामन्यांत त्यांनी ५१.६४च्या सरासरीने १९ हजार ७३० धावा केल्या.

देवधर यांच्या पुतळ्याचे औपचारिक अनावरणपीवायसी हिंदू जिमखान्याच्या वतीने विंचूरकर पॅव्हेलियनच्या नूतनीकरण वास्तूचे, प्रवेशद्वाराचे व पुतळ्याचे औपचारिक उद्घाटन व अनावरण माजी भारतीय क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांच्या हस्ते करण्यात आले. देवधर परिवारापैकी डॉ. दीपक आठवले, वृषाली आठवले आणि आदित्य पावनगडकर यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. यावेळी पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, दीपक गाडगीळ, सारंग लागू, सुरेंद्र भावे, माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, अमित दोशी, क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, अविनाश रानडे, तन्मय आगाशे, सिद्धार्थ भावे, अभिषेक ताम्हाणे, निरंजन गोडबोले, विनायक द्रविड उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Be Honest to Yourself: VVS Laxman's Advice to Young Players

Web Summary : VVS Laxman advises aspiring cricketers to face challenges head-on and be honest with themselves for success. He emphasized learning from cricket and identifying one's inner voice. He also inaugurated a statue at PYC Hindu Gymkhana, sharing career insights and inspiring stories.
टॅग्स :Indiaभारत