शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 18:17 IST

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, निवडणूक आयोग माध्यमांना वार्तांकन करू नका, असे सांगू शकत नाही. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, “उद्या पंतप्रधान त्यांच्या घरात ध्यान करत असतील आणि प्रसारमाध्यमांनी ते कव्हर केले तर ते उल्लंघन आहे का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवस चालणाऱ्या ध्यानधारणेदरम्यान आदर्श आचारसंहितेचे (MCC) उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्या, असा सल्ला निवडणूक आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला दिला आहे. तत्पूर्वी, देशातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने, पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या कन्याकुमारीतील ध्यान धारणेदरम्यानच शनिवारी सातव्या टप्प्याचे मतदान होणार आहे. यामुळे मतदानापूर्वी 48 तासांचा ध्यान धारणेचा कालावधी आदर्श आचार संहितेचे उल्लंघन आहे, अशा स्वरुपाची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती.

पंतप्रधान मोदींच्या प्रवासासाठी कुठल्याही परवानगीची आवश्यकता नाही - हिन्दुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी परवानगीची गरज नाही, कारण ते भाषणे देत नाहीत. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, ही प्रक्रिया 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटी वापरल्या गेलेल्या प्रक्रिये प्रमाणेच आहे. तेव्हा मोदींनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वीच मौन काळात बद्रीनाथ आणि केदारनाथला भेट दिली होती. 

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, निवडणूक आयोग माध्यमांना वार्तांकन करू नका, असे सांगू शकत नाही. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, “उद्या पंतप्रधान त्यांच्या घरात ध्यान करत असतील आणि प्रसारमाध्यमांनी ते कव्हर केले तर ते उल्लंघन आहे का? की विरोधी पक्ष असे म्हणत असेल तर हे उल्लंघन आहे? याला कसलाही अंत नाही.

पीएम मोदी मत मागत नाहीत - निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, प्रत्येक उमेदवाराला चिन्ह आणि प्रतिकांच्या माध्यमातून संवाद साधण्याचा अधिकार आहे. पंतप्रधान मोदी मतं मागत नाहीत. विरोधकही अशा प्रकारे प्रतीकांची मदत घेऊ शकतात. आपण सर्वांनी कायद्याच्या कक्षेत राहून काम करावे लागेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTamilnaduतामिळनाडूlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Meditationसाधना