शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वेळीच सावध व्हा! 2023 ठरले सर्वाधिक उष्ण वर्ष, जागतिक हवामान संस्थेने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 05:56 IST

२०२३ मध्ये जून ते डिसेंबरपर्यंत दर महिन्याला जागतिक तापमानाने नवा उच्चांक गाठला. त्यातही जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने वर्षभरातील सर्वाधिक उष्ण महिने ठरले. मागील वर्षात वार्षिक सरासरी तापमानात १.४५ अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली. 

नवी दिल्ली :  हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पॅरिस करारात निश्चित केलेल्या मर्यादेनुसार, वार्षिक तापमानात १.४५  अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्याने २०२३ हे वर्ष आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरल्याचे जागतिक हवामान संस्थेने (डब्ल्यूएमओ) जाहीर केले.२०२३ मध्ये जून ते डिसेंबरपर्यंत दर महिन्याला जागतिक तापमानाने नवा उच्चांक गाठला. त्यातही जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने वर्षभरातील सर्वाधिक उष्ण महिने ठरले. मागील वर्षात वार्षिक सरासरी तापमानात १.४५ अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली. 

पॅरिस करार काय आहे ?पूर्व औद्योगिक कालावधीतील (१८५०-१९००) पातळीपेक्षा सरासरी जागतिक तापमानवाढ २ अंशांपेक्षा कमी आणि १.५ अंशांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे पॅरिस करारात निश्चित केले होते. १.५ अंशांपेक्षा अधिक तापमानवाढ झाल्यास त्याचा निसर्गासह मानवजातीवरही भीषण परिणाम होण्याची शक्यताही वर्तविली होती.

जागतिक तापमानवाढ मोजण्यासाठी डब्ल्यूएमओने सहा वेगवेगळ्या परिमाणांचा आधार घेतला. त्यात प्रामुख्याने अमेरिका, इंग्लंड, युरोप, जपान या देशांतील अहवालांसह नासाच्या माहितीचाही आधार घेतला.

हवामान बदल हे सध्या जगापुढील सर्वांत मोठे संकट आहे. तापमानवाढ नियंत्रणासाठी अक्षय ऊर्जास्रोतांवर भर देण्याची आवश्यकता आहे.- सेलेस्टे सोलो, डब्ल्यूएमओ.

एक मोठे संकट आपल्यापुढे आ वासून उभे आहे. वेळीच तातडीच्या उपाययोजना न केल्यास मोठा फटका बसणार आहे.- अँटोनियो गुटारेस, महासचिव, संयुक्त राष्ट्रे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात