बीसीसीआई अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे निधन

By Admin | Updated: September 20, 2015 22:23 IST2015-09-20T21:57:55+5:302015-09-20T22:23:52+5:30

हृदयविकारावरील उपचारादरम्यान बीसीसीआई अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे कोलकाता येथील बी.एम बिर्ला खाजगी रूग्नालयात निधन झाले.

BCCI President Jagmohan Dalmiya passes away | बीसीसीआई अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे निधन

बीसीसीआई अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे निधन

 ऑनलाइन लोकमत 

कोलकाता, दि. २० - हृदयविकारावरील उपचारादरम्यान बीसीसीआई अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे कोलकाता येथील बी.एम बिर्ला खाजगी रूग्नालयात निधन झाले. ते ७५ वर्षाचे होते. दालमिया यांना १७ सप्टेंबर (गुरुवार) रोजी रात्री १० वाजता हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे त्यांना रूग्नालयात दाखल केला होते. काल त्यांची प्रक्रृती स्थीर होती. पण आज त्यांचे निधन झाले. जगमोहन दालमिया  यांनी मार्च २०१५ मध्ये बीसीसीआई अध्यक्षपद स्विकारले होते. बीसीसीआई अध्यक्ष म्हणून ही त्यांची तिसरी वेळ होती. याआधी २००१ मध्ये ते बीसीसीआई अध्यक्ष होते. १९९७ मध्ये ते आयसीसी अध्यक्ष होते. भारताचे पहिले आयसीसी अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला होता.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, सौरव गांगूली रूग्नालयात पोहचले असून ममता बनर्जी यांनी  दालमियाच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.  
 

Web Title: BCCI President Jagmohan Dalmiya passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.