बीसीसीआयची बैठक 18 नोव्हेंबरला चेन्नईत
By Admin | Updated: November 16, 2014 01:27 IST2014-11-16T01:27:57+5:302014-11-16T01:27:57+5:30
आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या मुद्गल समितीच्या अहवालामध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या नावाचा उल्लेख आला आहे.

बीसीसीआयची बैठक 18 नोव्हेंबरला चेन्नईत
नवी दिल्ली : आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या मुद्गल समितीच्या अहवालामध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या नावाचा उल्लेख आला आहे. यामुळे बीसीसीआयने कार्यसमितीची तातडीची बैठक 18 नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे बोलविली आहे. वार्षिक आमसभा (एजीएम) चार आठवडय़ांसाठी स्थगित करण्यात आली त्याची नवीन तारीखसुद्धा या बैठकीत निश्चित होण्याची शक्यता आहे.
श्रीनिवासन तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे (टीएनसीए) अध्यक्ष म्हणून या बैठकीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. चेन्नईत होणा:या बैठकीमध्ये बोर्डाच्या उपसमितीच्या सदस्यांना सध्याच्या परिस्थितीबाबत माहिती देण्यात येणार आहे. बीसीसीआयचा एक अधिकारी म्हणाला, ‘बीसीसीआयचे वकील कार्यसमितीच्या सदस्यांना सध्याच्या परिस्थितीची व कायद्यातील तरतुदीबाबत माहिती देतील. एजीएमची तारीख निश्चित करण्यासाठी कार्य समितीची बैठक आवश्यक आहे. आता एजीएम डिसेंबरच्या तिस:या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे.’
स्पॉट फिक्सिंग व सट्टेबाजी प्रकरणाची पुढील सुनावणी 24 नोव्हेंबरला होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे बीसीसीआयने एजीएम स्थगित करण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयच्या अनेक सदस्यांना श्रीनिवासन यांची प्रतिमा स्वच्छ हवी आहे. श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या दुस:या कार्यकाळासाठी शर्यतीत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आयसीसीचे चेअरमन एन.
श्रीनिवासन, त्यांचे जावई गुरुनाथ मयप्पन, राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा आणि क्रिकेट प्रशासक
सुंदर रमण यांच्या नावांचा
उल्लेख केला. न्यायमूर्ती मुद्गल समितीच्या चौकशी अहवालामध्ये यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. (वृत्तसंस्था)
च्न्या़ मुकुंद मुद्गल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगासमोर आपण कधीच हजर झालो नाही, असे इंग्लंडचा माजी फलंदाज ओवेश शाह याने म्हटले आह़े सर्वोच्च न्यायालयाने इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील चौकशीसंबंधित सुनावणीदरम्यान अनवधानाने या खेळाडूचे नाव घेतले होत़े
च्इंग्लंडकडून 6 कसोटी, 71 वन-डे आणि 17 टी-2क् सामने खेळणा:या शाह याने या प्रकरणी खेद व्यक्त केला आह़े तो म्हणाला, मला न्यायालयाकडून या प्रकरणी कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही़ न्या़ मुकुंद मुद्गल चौकशी आयोग आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयात मी कधीच हजर झालेलो नाही़ तसेच या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला मी भेटलो नाही़ मात्र, तरीही या प्रकरणी माङयावर आरोप का लावण्यात आले, हे अद्यापही कळाले नाही़
च्शाह याने पुढे सांगितले, की भारताच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या मुद्गल समितीच्या रिपोर्टमध्ये माङो नाव आरोपी म्हणून आहे, हे मला माहीत नव्हत़े वर्तमानपत्रत ही बातमी वाचल्यानंतर मला याबद्दल माहीत झाले, असेही शाह म्हणाला़