बीसीसीआय पत्रकारांना देणार वार्षिक कार्ड
By Admin | Updated: June 23, 2016 21:32 IST2016-06-23T21:18:39+5:302016-06-23T21:32:30+5:30
क्रिकेट मालिका आणि सामन्याचे वृत्तांकन करण्यासाठी क्रीडा पत्रकारांना यापुढे वेगवगळे कार्ड तयार करण्याची गरज भासणार नाही.

बीसीसीआय पत्रकारांना देणार वार्षिक कार्ड
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - क्रिकेट मालिका आणि सामन्याचे वृत्तांकन करण्यासाठी क्रीडा पत्रकारांना यापुढे वेगवगळे कार्ड तयार करण्याची गरज भासणार नाही. बीसीसीआयने वार्षिक कार्ड तयार करण्याची योजना आखली आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू होईल. धर्मशाळा येथे झालेल्या मीडिया मॅनेजर्सच्या संमेलनादरम्यान हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती डीडीसीएचे मीडिया मॅनेजर सलील सेठ यांनी दिली. नव्या सत्रापूर्वीच हे कार्ड तयार करण्यात येणार असृून त्यासाठी आॅनलाईन
अर्ज करावा लागेल, असे ते म्हणाले.