बीसीसीआय न्यायालय
By Admin | Updated: February 18, 2015 23:53 IST2015-02-18T23:53:52+5:302015-02-18T23:53:52+5:30
श्रीनिवासन यांच्याविरुद्ध अवमानना

बीसीसीआय न्यायालय
श रीनिवासन यांच्याविरुद्ध अवमाननाकारवाई करा : कॅट कोर्टातनवी दिल्ली : श्रीनिवासन आणि बीसीसीआयच्या अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी कारवाई सुरू करण्याची विनंती करणारी याचिका क्रिकेट असोसिएशन ऑफ बिहारने(कॅब) सवार्ेच्च न्यायालयात दाखल केली आहे. श्रीनिवासन तसेच बोर्डाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी सवार्ेच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करता बोर्डाची आमसभा मार्चमध्ये घेण्यासंदर्भात कार्यसमितीची बैठक घेतल्याचा संघटनेचा आरोप आहे. कॅबचे सचिव आदित्य वर्मा यांनी ही याचिका दाखल केली असून श्रीनिवासन, बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष शिवलाल यादव आणि सचिव संजय पटेल यांच्याविरुद्ध अवमाननेची कारवाई सुरू करण्याची कोर्टाला विनंती केली. न्या. टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाकडे ही याचिका आली आहे. यावर लवकरच सुनावणी करण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले. याचिकेत मीडियातील वृत्ताचा उल्लेख करीत सवार्ेच्च न्यायालयाने २२ जानेवारी रोजी दिलेल्या निर्णयामुळे अपात्र असलेले निर्वासित अध्यक्ष श्रीनिवासन यांनी ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या बोर्डाच्या कार्यसमितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कसे काय भूषविले यावर वर्मा यांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. (वृत्तसंस्था)..................................................................