शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जेएनयूनंतर जामियामध्येही PM मोदींवरील डॉक्युमेंट्रीमुळे वाद, काही विद्यार्थी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 17:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीशी संबंधीत डॉक्युमेंट्रीचा वाद वाढत चालला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बीबीसीने बनवलेल्या डॉक्युमेंट्रीचा (BBC Documentry) वाद वाढत चालला आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाl (JNU) डॉक्युमंट्रीच्या स्क्रीनिंगवरुन वाद झाला होता. त्यानंतर आता दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातही यावरुन वाद झाला आहे. जामियाच्या विद्यार्थ्यांसाठी या माहितीपटाचे स्क्रीनिंग सायंकाळी 6 वाजता ठेवण्यात आले आहे. मात्र, जामिया मिलिया प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या मेळाव्यावर बंदी घातली आहे. 

मंगळवारी रात्री जेएनयूमध्ये माहितीपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान दोन विद्यार्थी गटांमध्ये वाद झाला होता. वादानंतर दगडफेकीच्या घटनाही घडल्याचा आरोप आहे. दिल्लीच्या जामिया मिलिया युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी आज संध्याकाळी 6 वाजता विद्यापीठ कॅम्पसमध्ये पीएम मोदींवरील बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांच्या या घोषणेनंतर विद्यापीठ प्रशासनाने कारवाई केली आणि कॅम्पसमध्ये कोणत्याही प्रकारच्या मेळाव्यास बंदी घातली. काल रात्री जेएनयूमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जामिया प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 

सोशल साइट्सवर डॉक्युमेंट्री ब्लॉक पीएम मोदींवरील माहितीपट भारतात सोशल मीडिया साइट्सवर ब्लॉक करण्याचे आदेश दिल्यानंतर वाद वाढला. मंगळवारी जेएनयूमध्ये डॉक्युमेंट्रीच्या प्रदर्शनावरुन झालेला वाद इतका वाढला की दगडफेकही झाली. दोन्ही विद्यार्थी गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. आज दिल्ली पोलिसांनी विद्यापीठात डॉक्युमेंटरी स्क्रीनिंगवरुन गोंधळ घालणाऱ्या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

जेएनयू प्रशासनाने वीज खंडित केली विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंटरी स्क्रीनिंग केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर जेएनयू प्रशासनाने कॅम्पसची वीज खंडित केली होती. वीज खंडित झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या एका गटाने लॅपटॉप आणि फोनवर पीएम मोदींवरील माहितीपट दाखवला. वीज खंडित झाल्यानंतर कॅम्पसमध्ये अंधार पडला आणि काही विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली, त्यामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीjnu - jawaharlal nehru universityजेएनयू