स्वतंत्र विदर्भ हक्काची लढाई

By Admin | Updated: April 7, 2016 00:26 IST2016-04-07T00:26:20+5:302016-04-07T00:26:20+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्यावर अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिला.

The battle for the independent Vidarbha claim | स्वतंत्र विदर्भ हक्काची लढाई

स्वतंत्र विदर्भ हक्काची लढाई

मधुकर कुकडे : श्रीहरी अणे यांची ११ ला जाहीर सभा
भंडारा : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्यावर अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिला. विदर्भवादी अणे यांना आमचा पाठिंबा असून हे आंदोलन आता लोक आंदोलन झाले पाहिजे. विदर्भाच्या मागणीसाठी पक्ष त्याग करण्यात आम्ही समोर राहू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, काँग्रेसचे माजी आमदार अ‍ॅड.आनंदराव वंजारी यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिला.
अ‍ॅड. श्रीहरी अणे हे ११ एप्रिल रोजी भंडारा येथे येणार असून त्यांची बहिरंगेश्वर व्यायाम शाळा खांबतलाव परिसरात सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा होणार आहे. या जाहिर सभेची माहिती देताना कुकडे व वंजारी म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी पक्षभेद विसरून लोकचळवळ उभी राहणे आवश्यक आहे. हे आंदोलन तळागाळात पोहोचले आहे. त्याला नवीन ऊर्जा देण्याची आवश्यकता आहे. विदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या सर्वश्रृत आहे. शेतकरी संघटनांसह वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ असलेल्या सर्व अराजकीय संस्थांनी एकत्र येण्याची गरज आहे.
पत्रपरिषदेला नगरसेवक महेंद्र निंबार्ते, हिवराज उके, सदानंद इलमे, राजू हेडाऊ, प्रमोद धार्मिक, तुषार हटवार, शशांक जोशी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The battle for the independent Vidarbha claim