बॅटरी चोरणाऱ्या आरोपीस अटक

By Admin | Updated: July 12, 2015 23:56 IST2015-07-12T23:56:41+5:302015-07-12T23:56:41+5:30

नागपूर : अंगणात ठेवलेली ट्रकची बॅटरी चोरून नेणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीसह दोघांना बॅटरीमालकाने पाठलाग करून पकडले. निखील प्रकाश मस्के (वय १९) असे त्यातील एका आरोपीचे नाव आहे.

Battery thief arrested | बॅटरी चोरणाऱ्या आरोपीस अटक

बॅटरी चोरणाऱ्या आरोपीस अटक

गपूर : अंगणात ठेवलेली ट्रकची बॅटरी चोरून नेणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीसह दोघांना बॅटरीमालकाने पाठलाग करून पकडले. निखील प्रकाश मस्के (वय १९) असे त्यातील एका आरोपीचे नाव आहे.
शनिवारी रात्री ८ च्या सुमारास ओमप्रकाश मनोहरराव नथिले यांच्या अंगणातील ट्रकची बॅटरी आरोपी निखील आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने उचलली. ते दिसताच नथिले यांनी उपरोक्त आरोपीचा पाठलाग करून त्यांना पोलिसांच्या मदतीने पकडले. अजनी पोलिसांनी निखीलला अटक केली. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले.
-------

Web Title: Battery thief arrested