शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

निष्पाप व्यक्तीला चुकीच्या गुन्ह्यात अडकवू नका; बाटला हाऊस चकमकीवरून पेटला राजकीय वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 09:35 IST

आरिज उर्फ जुनैद हा २००८ पासून भारतातील गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होता.

दिल्ली पोलिसांनी बुधवारी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिज खान उर्फ जुनैदला अटक केल्यानंतर आता बाटला हाऊस चकमकीवरून नवा राजकीय वाद पेटला आहे. २००८ मध्ये दिल्लीत झालेल्या बाटला हाऊसमधील चकमकीनंतर आरिज खान पसार झाला होता. मात्र, आता या चकमकीच्या जुन्या संदर्भांचा दाखला देत राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायला सुरूवात केली आहे. आरिज खानला अटक झाल्यामुळे बाटला हाऊस एन्काऊंटरनंतर मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे पितळ उघडे पडले आहे, अशी टीका भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी केली. तर काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी बाटला हाऊस चकमकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एखाद्या गुन्हेगाराला अटक करणे, हे पोलिसांचे कर्तव्यच आहे. गुन्हेगाराला अटक केल्यानंतर त्याच्यावर लगेचच आरोपपत्र दाखल करणेही गरजेचे असते. आरिज खानलाही बाटला हाऊस चकमकीच्यावेळी अटक होणे गरजेचे होते. मात्र, तसे होऊ शकले नाही. याविषयी पोलिसांनी स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. मात्र, आता त्याला अटक झाली आहे तर या सगळ्याचा खुलासा होणे गरजेचे असल्याची मागणी सलमान खुर्शिद यांनी केली. या चकमकीनंतर राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून अनेक आरोप झाल्याचे दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी सांगितले. मात्र, आरिजच्या अटकेमुळे हे आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध झाल्याचे नीरज कुमार यांनी म्हटले. मात्र, बाटला हाऊसमधील रहिवाशांकडून आरिज खानच्या अटकेविषयी शंका उपस्थित करण्यात आली आहे. 2008 मधील चकमक संशयास्पद होती. त्यानंतर काल आरिज खानला करण्यात आलेली अटकही, संशयास्पद वाटते. एखाद्याने गुन्हा केला असेल तर त्याला जरुर अटक करावी. मात्र, एखाद्या निष्पाप व्यक्तीला चुकीच्या गुन्ह्यात गोवले जाऊ नये, एवढेच आम्हाला वाटते, अशी प्रतिक्रया येथील एका रहिवाशाने दिली. 

सप्टेंबर २००८ मध्ये दिल्लीतील बाटला हाऊस येथील चकमकीत आरिज खान हा पळून जाण्यात जाण्यात यशस्वी ठरला होता. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. तर दोघांना पोलिसांनी अटक केली होती. पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा या चकमकीत शहीद झाले होते. आरिज उर्फ जुनैद हा २००८ पासून भारतातील गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होता. त्याचा पाच बॉम्बस्फोटांमध्ये हात असल्याची माहिती पोलिसांकडे होती. अखेर दिल्ली पोलिसांनी भारत – नेपाळ सीमेवरुन त्याला अटक केली आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेस