शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धरामय्या कुमारस्वामींवर पुन्हा नाराज; आता फिल्म सिटीवरुन नाट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 18:11 IST

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना पुन्हा एकदा नव्या विषयावर आपली नाराजी कळवली आहे. सरकारच्या विविध निर्णयांवर सिद्धरामय्या यांनी अनेकदा नापसंती व्यक्त केली आहे.

बंगळुरु- कर्नाटक सरकारमधील ओढाताण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना पुन्हा एकदा नव्या विषयावर आपली नाराजी कळवली आहे. सरकारच्या विविध निर्णयांवर सिद्धरामय्या यांनी अनेकदा नापसंती व्यक्त केली आहे.

फिल्म सिटीचा प्रकल्प रामनगर येथे स्थापन केला जाऊ नये असे सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामींना पत्र लिहिले आहे. सिद्धरामय्या यांनी गेल्या दोन महिन्यात मुख्यमंत्र्यांना लिहिलेले हे पाचवे पत्र आहे. सिद्धरामय्या गेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीही होते. गेल्या सरकारचे शेवटचे बजेट सादर करताना त्यांनी म्हैसुर येथे फिल्मसिटी स्थापन  करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र सध्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामींनी हा निर्णय बदलून फिल्म सिटी रामनगर येथे नेण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दलच सिद्धरामय्या यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. कुमारस्वामींनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

कन्नड अभिनेता राजकुमार याने फिल्म सिटी म्हैसुरमध्ये असणे हिताचे असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांचाही उल्लेख सिद्धरामय्या यांनी पत्रात केला आहे. म्हैसुरमध्ये फिल्मसिटीचे काम सुरु झाले असून कन्नड चित्रपटसृष्टीच्या हिताच्या दृष्टीने कुमारस्वामींनी निर्णय घ्यावा असे सिद्धरामय्या यांनी पत्रात नमूद केले आहे.कुमारस्वामी यांच्या जेडी (एस) काँग्रेस आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यापासून सिद्धारामय्या यांनी कुमारस्वामी आणि त्यांच्या मंत्र्यांना समस्यांचा पाढा वाचणारी पत्रे पाठवण्याचा धडाका लावला आहे. यापैकी बहुतांश पत्रांमध्ये सिद्धारामय्या यांनी त्यांच्या बदामी या मतदारसंघातील समस्यांचा पाढा वाचला आहे. तसेच खनिज तेलावरील कर वाढवण्याच्या तसेच पीडीएस-बीपीएल कुटुंबीयांसाठी देण्यात येणाऱ्या तांदळाच्या पुरवठ्यात घट करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी सिद्धारामय्या यांनी केली आहे. 

सिद्धारामय्या यांच्या या पत्रांमुळे  कुमारस्वामी चांगलेच त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आघाडी सरकार चालवतानाच्या अडचणींचा पाढा वाचला होता. दरम्यान, कुमारस्वामी यांना डिवचण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी सिद्धारामय्या हा पत्रप्रपंच करत असल्याचे मत राजकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.  

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याkumarswamyकुमारस्वामीKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारण