आधार स्टींग
By Admin | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:28+5:302015-07-16T15:56:28+5:30
अडीच वाजेच्या सुमारास टीम अप्पू हत्ती चौकातील महा ई सेतू केंद्रावर पोहचली. तेथेही बाहेर गर्दी होती. रस्त्याकडेलाच असलेल्या या केद्रांत आधार काढायचे अशी विचारणा केली. तर मिळेल असे उत्तर मिळाले.पण आता खूप गर्दी आहे. संध्याकाळी किंवा उद्या सकाळी या असा सल्ला दिला गेला. केंद्रातून चाळिशी पार केलेले पुरूष आधार नोंदणी करून आले. त्यांची विचारपूस केली तर ५० रुपये दिले असल्याचे त्यांनी सांगितले. पावतीसाठी थांबा म्हणाले, म्हणून थांबलो. सकाळीच आलो. आता पावती कधी मिळेल माहिती नाही. आधार कार्ड घरी आले तर ठिक नाहीतर पंधरा दिवसांनी पुन्हा या असे सांगितले आहे. पैसे कशासाठी असे विचारले असता त्यांनी ते द्यावेच लागतात, नाहीतर आधार मिळत नाही असे स्पष्ट सांगितले.

आधार स्टींग
अ ीच वाजेच्या सुमारास टीम अप्पू हत्ती चौकातील महा ई सेतू केंद्रावर पोहचली. तेथेही बाहेर गर्दी होती. रस्त्याकडेलाच असलेल्या या केद्रांत आधार काढायचे अशी विचारणा केली. तर मिळेल असे उत्तर मिळाले.पण आता खूप गर्दी आहे. संध्याकाळी किंवा उद्या सकाळी या असा सल्ला दिला गेला. केंद्रातून चाळिशी पार केलेले पुरूष आधार नोंदणी करून आले. त्यांची विचारपूस केली तर ५० रुपये दिले असल्याचे त्यांनी सांगितले. पावतीसाठी थांबा म्हणाले, म्हणून थांबलो. सकाळीच आलो. आता पावती कधी मिळेल माहिती नाही. आधार कार्ड घरी आले तर ठिक नाहीतर पंधरा दिवसांनी पुन्हा या असे सांगितले आहे. पैसे कशासाठी असे विचारले असता त्यांनी ते द्यावेच लागतात, नाहीतर आधार मिळत नाही असे स्पष्ट सांगितले. ..........आधार कार्ड नोंदणीची व्यवस्था महा ई सेवा केंद्रात करण्यात आली आहे. नोंदणी मोफत करण्याची सुविधा असली तरी केंद्र संचालक मात्र माणूस पाहून पैसे घेत आहेत. ग्रामीण भागातील माणूस दिसला की शंभर किंवा त्यापेक्षा अधिक, मध्यमवर्गीय दिसला की पन्नास अन् सुटाबुटातील माणूस आला की त्याला मात्र फुकट पण मानसिक त्रास देऊन आधार नोंदणी होत असल्याचे चित्र या दोन केंद्रावर दिसून आले.