शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात! BSF चं वाहन आणि ट्रकची जोरदार धडक; 2 जवानांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 10:38 IST

अपघातात बीएसएफच्या दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 5 जवान गंभीर जखमी झाले आहेत.

भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या बारमेर जिल्ह्यातील चौहटन पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी रात्री बीएसएफचे वाहन आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की बीएसएफच्या गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातात बीएसएफच्या दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 5 जवान गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जोधपूरला हलवण्यात आले आहे. दोन जवानांवर बारमेर आणि एका जवानावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बारमेर-चौहटन मार्गावरील चौहटन बसस्थानकाजवळ हा अपघात झाला. सीमा सुरक्षा दलाच्या 83 व्या बटालियनचे सात जवान सेडवा येथून बारमेरला त्यांच्या कामासाठी येत होते. याचदरम्यान चौहान शहराजवळ बीएसएफचे वाहन आणि समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच चौहटन पोलीस ठाणे व परिसरातील नागरिक तेथे पोहोचले. त्यांनी तत्काळ गंभीर जखमी जवानांना चौहटन येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर चार जवानांना बारमेर येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात रेफर करण्यात आले. त्याचवेळी जखमी जवानाला चौहटन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. नंतर बाडमेरमधील दोन जवानांनाही जोधपूरला पाठवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच बीएसएफचे अधिकारी, जिल्हाधिकारी लोकबंधू, एएसपी नरपत सिंह जैतावत आणि एसडीएम घटनास्थळी पोहोचले.

जिल्हाधिकारी लोकबंधू यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफचे वाहन आणि ट्रक यांच्यात धडक झाली. गाडीत 7 सैनिक होते. बीएसएफच्या 83 व्या बटालियनचे दोन जवान के. टुडू आणि धीरज कुमार यांचा मृत्यू झाला. एन. सिलवास आणि कुंदन केआर दुबे यांच्यासह पाच जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर उत्तम उपचार करण्याचे निर्देश डॉक्टरांना देण्यात आले आहेत. बीएसएफचे जवान कामावर होते आणि ड्युटीवर असताना ही दुर्घटना घडल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थान