बारडचे ग्रामीण रुग्णालय लागले कामाला

By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:14+5:302015-06-25T23:51:14+5:30

बारड : येथील ग्रामीण रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी झपाट्याने कामाला लागले आहे़ रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकार्‍यास घेराव घातला होता़

Bard's rural hospital started to work | बारडचे ग्रामीण रुग्णालय लागले कामाला

बारडचे ग्रामीण रुग्णालय लागले कामाला

रड : येथील ग्रामीण रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी झपाट्याने कामाला लागले आहे़ रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकार्‍यास घेराव घातला होता़
या संदर्भातील सविस्तर वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते़ आता ग्रामीण रुग्णालय जागे झाले़ वैद्यकीय अधिकारी डॉ़जे़व्ही़ पावडे यांनी संबंधितांना सूचना केल्या आहेत़ रुग्णसेवा, प्रसुती सेवा, रात्रपाळीची सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती डॉ़पावडे यंानी दिली़ रात्रपाळीसाठी एक डॉक्टर, एक परिचारिका, एक सर्व्हंट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले़ सद्यस्थितीत ओपीडीत १५० रुग्ण दररोज येतात़ महिनाकाठी २० ते २२ महिला रुग्ण प्रसुतीसाठी दाखल होतात़ सद्यस्थितीत संडास, उलटीचे पेशंट येत असून ग्रामीण रुग्णालयात भरपूर औषधी साठा असल्याची माहितीही पावडे यांनी दिली़

बीएसएनएलचे मोबाईल सेवा विस्कळीत
बारड : या परिसरातील बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहक व शेतकर्‍यांना या सेवेचा काहीही उपयोग होत नाही़
ग्रामीण भागात जनतेचा कल बीएसएनएलकडे आहे़ मागील ५ ते ६ दिवसांपासून विस्कळीत सेवेमुळे मोबाईल यंत्रणा खंडित झाली़ यामुळे संपर्क साधणे अवघड झाले आहे़ नेटवर्क सेवाही बंद पडली़ शेतकरी, विद्यार्थ्यांची कामे रेंगाळली़
अर्धापूर उपविभागामार्फत बारड टेलिफोन कार्यालयाचे काम चालते़ कार्यालयात कर्मचारी हजर नसतात़ अपडाऊन करतात, असा आरोप ग्राहकांचा आहे़

आकलन क्षमता चाचणी
मोहपूर, ता़किनवट : डॉ़बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास अभियानांतर्गत जि़प़कें़ प्रा़शाळा मोहपूर ता़किनवट येथे आकलन क्षमता चाचणी घेण्यात आली़ यावेळी केंद्रप्रमुख मडावी, एच़बी़सोनवणे यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची सर्व विषयांची लेखी व तोंडी चाचणी घेतली़ शाळेतील २२० पैकी १८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़

Web Title: Bard's rural hospital started to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.