बराक ओबामा यांच्याविरुद्धची याचिका कोर्टाने केली खारीज
By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:21+5:302015-02-11T23:19:21+5:30
अलाहाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताची धर्मनिरपेक्ष प्रतिमा मलीन केली, असा आरोप करणारी याचिका एका स्थानिक न्यायालयाने खारीज केली़

बराक ओबामा यांच्याविरुद्धची याचिका कोर्टाने केली खारीज
अ ाहाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताची धर्मनिरपेक्ष प्रतिमा मलीन केली, असा आरोप करणारी याचिका एका स्थानिक न्यायालयाने खारीज केली़सुशील कुमार मिश्रा नामक वकिलाने ही याचिका दाखल केली होती़ ओबामांविरुद्ध भादंविच्या कलम ५०० (अबु्रनुकसानीसाठी शिक्षा)अंतर्गत खटला भरा, अशी मागणी याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत केली होती़ ओबामांनी देशात धार्मिक असहिष्णुता वाढविणारे वक्तव्य करून भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशाची प्रतिमा मलीन केली, असा आरोप मिश्रा यांनी आपल्या याचिकेत केला होता़न्यायदंडाधिकारी नीलिमा सिंह यांनी काल मंगळवारी संबंधित याचिका विचारयोग्य नसल्याचे सांगून ती खारीज केली़