शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दे दणादण! नशेत असलेल्या नवरदेवाने नवरीला मारली लाथ; सासरच्या मंडळींसोबत हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 09:59 IST

दारूच्या नशेत असलेल्या नवरदेवाने सर्व मर्यादा ओलांडल्या. नवरदेवाने भर मंडपात नवरीशी गैरवर्तन केलं आणि मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सासरच्या मंडळींशी हाणामारी केली.

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील रामनगर तहसील अंतर्गत येणाऱ्या गणेशपूर गावात शुक्रवारी रात्री एका लग्नसोहळ्यात तुफान राडा झाला. हार घालण्याच्या वेळी दारूच्या नशेत असलेल्या नवरदेवाने सर्व मर्यादा ओलांडल्या. नवरदेवाने भर मंडपात नवरीशी गैरवर्तन केलं आणि मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सासरच्या मंडळींशी हाणामारी केली. या घटनेमुळे लग्नाच्या आनंदावर विरजण पडलं आणि तिथे एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, बहराइच जिल्ह्यातील मुराइनपुरवा येथून ही वरात आली होती. वरातीचे स्वागत मोठ्या उत्साहात आणि रितीरिवाजाप्रमाणे करण्यात आलं. रात्री ११ च्या सुमारास नवरदेव विशाल स्टेजवर पोहोचला, पण तो नशेमुळे स्वतःवरचं नियंत्रण गमावून बसला होता. विधी सुरू असतानाच अचानक विशालने नवरी निशा हिला लाथ मारली, हे पाहून उपस्थित पाहुणे आणि वधूपक्ष संतापले.

जेव्हा मुलीचे वडील सत्रोहन यांनी आपल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नवरदेवाने त्यांच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून वधू पक्षाच्या लोकांचा संयम सुटला आणि दोन्ही बाजूंकडून जोरदार हाणामारी सुरू झाली. लग्न मंडपाचं रूपांतर हाणामारीत झालं. रागाच्या भरात लोकांनी अनेक खुर्च्या तोडल्या आणि पाहुणे आपला जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावू लागले. या हिंसक झटापटीत नवरदेवाची बहीण, मेहुणे आणि एक वऱ्हाडी गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच महादेवा चौकी प्रभारी रवींद्र सिंह फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि जखमींना तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्रात (CHC) उपचारासाठी पाठवले. रात्रभर गावात तणावाचे वातावरण होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि माजी सरपंचांनी पुढाकार घेऊन दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी केली. त्यानंतर लग्नाचे उर्वरित विधी पूर्ण करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Drunk Groom Kicks Bride, Brawl Erupts at Wedding Ceremony

Web Summary : A wedding in Uttar Pradesh turned chaotic when a drunk groom kicked the bride during the ceremony. This sparked a brawl between the groom's and bride's families, leaving several injured. Police intervened, and the wedding was eventually completed after mediation.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नPoliceपोलिस