शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या बसला भीषण आग, प्रवाशांनी उड्या मारुन वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 23:26 IST

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संत कबीर नगर ते लखनौला प्रवाशांना घेऊन जाणारी रोडवेज एसी बसला बाराबंकी जिल्ह्याच्या सीमेवर आल्यानंतर अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली.

बाराबंकी : संत कबीर नगरहून लखनौला जाणाऱ्या रोडवेज बसला बुधवारी कोतवाली भागातील रसौली येथे भीषण आग लागली. यादरम्यान बसमधील प्रवाशांनी बसमधून उड्या मारून आपला जीव वाचवला. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने पोहोचल्या. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संत कबीर नगर ते लखनौला प्रवाशांना घेऊन जाणारी रोडवेज एसी बसला बाराबंकी जिल्ह्याच्या सीमेवर आल्यानंतर अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली.

बसमध्ये बसलेल्या लोकांनी घाईघाईत बसमधून उडी मारून आपला जीव वाचवला. या अपघातात प्रवासी सुखरूप खाली उतरले असले तरी अनेकांचे सामान जळून राख झाले आहे. बसला आग लागल्यानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती, लखनौ-अयोध्या महामार्गावर टाटा मोटर्ससमोर अचानक बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. चालक व प्रवासी बसमधून खाली उतरेपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले आणि काही वेळातच बस खाक झाली. यामध्ये प्रवाशांचा जीव वाचला असला तरी यातील बहुतांश प्रवाशांचे सामान जळून राख झाले आहे.

... तर दुर्घटना घडली नसती, प्रवाशांचा आरोपदरम्यान, बसमध्ये बसलेल्या प्रवाशांनी बस चालकावर आरोप करत बसमध्ये कोणत्याही प्रकारचे अग्निशमन उपकरण नसल्याचे सांगितले. शॉर्टसर्किटनंतर धूर निघत असताना अग्निशमन यंत्राचा वापर केला असता तर कदाचित आमचे सामान आणि बस दोन्ही वाचले असते, असे प्रवाशांनी सांगितले. तसेच, अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर बसमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तासनतास सुरू असलेल्या या बचावकार्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील लखनौकडे जाणारी लेन दोन तास ठप्प झाली होती. 

टॅग्स :fireआग