शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेव जोमात, नवरी कोमात! लग्नपत्रिकेत मोठी चूक झाली, 1 दिवस आधीच वरात आली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 11:44 IST

लग्न ठरलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच लग्नाची वरात वधूच्या दारात पोहोचल्याची विचित्र घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात लग्न ठरलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच लग्नाची वरात वधूच्या दारात पोहोचल्याची विचित्र घटना समोर आली आहे. ठरलेल्या दिवसाआधीच वरात दारात आल्याचं पाहून वधूच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. लग्नात पाहुण्यांसह नवरदेव आणि त्याच्या कुटुंबातील अनेक लोक उपस्थित होते. वरात आल्यावर वधूचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी घाईघाईने सर्व व्यवस्था केली. ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

हमीरपूरच्या सिकरोडी गावचे रहिवासी रामफळ अनुरागी यांची मुलगी रेखा हिचं लग्न कोतवाली येथील पारा पूरवा गावातील बेटारामसोबत ठरलं होतं. लग्नाची तारीख 27 फेब्रुवारी ठरवण्यात आली होती. पण लग्नाची वरात एक दिवस आधीच म्हणजेच 26 फेब्रुवारीला वधूच्या दारात पोहोचली. हे पाहून सगळेच हैराण झाले.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाची पत्रिका छापताना 27 ऐवजी 26 फेब्रुवारीची तारीख छापण्यात आली होती. त्यांच्या घरात फार कोणी शिकलेलं नव्हतं. त्यामुळे तारखेकडे कोणीही लक्ष दिलं नाही आणि नातेवाईकांमध्ये लग्नपत्रिकेचं वाटप करण्यात आलं होतं. 26 फेब्रुवारीला ते लग्नाची वरात घेऊन सिकरोडी गावात पोहोचले. तेथे गेल्यानंतर त्यांना कळलं की, लग्नाची तारीख 27 फेब्रुवारी ठरवण्यात आली होती.

एक दिवस आधीच दारात लग्नाची वरात पाहून मुलीचे कुटुंबीयही हैराण आणि अस्वस्थ झाले. मात्र, गावकऱ्यांच्या मदतीने सर्व व्यवस्था करून रितीरिवाजानुसार विवाह पार पडला. गावातील रहिवासी अशोक कुमार पांडे यांनी सांगितलं की, रेखाच्या वडिलांचं निधन झाले आहे. गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन मदत केली. स्वागतासाठी रात्रभर जय्यत तयारी करण्यात आली. सध्या या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश