शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Bappi Lahiri Death: 'प्रत्येक पिढीतील लोक त्यांची गाणी ऐकायचे', PM मोदींनी व्यक्त केला शोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 10:13 IST

PM Modi on Bappi Lahiri Death: प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचे निधन, मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नवी दिल्ली: बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचे निधन झाले. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी ट्विट करून बप्पी दांना श्रद्धांजली वाहिली. 

काय म्हणाले पीएम मोदी?'बप्पी लहरी जी यांचे संगीत सर्वसमावेशक आणि विविध भावना सुंदरपणे व्यक्त करणारे होते. प्रत्येक पिढीतील लोक त्यांची गाणी ऐकायचे. त्यांचा मनमिळावू स्वभाव सर्वांच्या लक्षात राहील. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती.'

अमित शहा यांनीही शोक व्यक्त केलाकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही बप्पी दा यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, 'प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बप्पी दा त्यांच्या अष्टपैलू गायनासाठी आणि जिवंत स्वभावासाठी लक्षात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना.'

बप्पी दा अनेक दिवसांपासून आजारी होतेबप्पी लहरी हे अनेक दिवसांपासून आजारी होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये बप्पी दा यांना कोरोनाची लागण झाली होती. ओएसए (ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनिया) मुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बप्पी दा यांनी 70-80 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली. 80 आणि 90 च्या दशकात भारतात डिस्को संगीत लोकप्रिय करण्यात बप्पी दा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बप्पी दा यांना 1985 मध्ये 'शराबी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 

टॅग्स :Bappi Lahiriबप्पी लाहिरीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह